घरदेश-विदेश...नाहीतर कोर्ट करणार मुलीचे नामकरण

…नाहीतर कोर्ट करणार मुलीचे नामकरण

Subscribe

नावात काय आहे ? हे विल्यम शेक्सपिअरचं वाक्य आपणं सर्रास वापरतो. पण एका दाम्पत्याला मुलीचे ठेवलेले नाव डोक्याला ताप झाले आहे. बाळाचे नाव ठेवल्यानंतर हे नाव योग्य नाही असे सांगत कोर्टाने चक्क ‘नाव बदला’ असा आदेश दिला आहे. शिवाय मुलीचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न पडला असेल तर कोर्ट मुलीचे नामकरण करेल, असा अजब सल्ला देखील कोर्टाकडून देण्यात आल्या आहेत.

नाव संस्कृतीत बसत नाही

- Advertisement -

घरात बाळाचे आगमन होणार म्हटल्याबरोबर मुलगा किंवा मुलगी कोणीही असो, त्याचे नाव काय ठेवायचे हे अनेक जण आधीच ठरवतात. खूप विचार करुन शोधून बाळाचे नाव ठेवले जाते. इटलीमधील व्हिक्टोरिया आणि लुका एका दांपत्याने त्यांच्या लेकीचे नाव ‘ब्लू’ असे ठेवले. या नावात काही वावगे आहे असे तुम्हा- आम्हाला नक्कीच वाटणार नाही. पण मिलान कोर्टाने मात्र हे नाव संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत मुलीचे नाव बदला असा आदेश दिला आहे. कोर्टाचा हा अजब आदेश ऐकून या दांपत्याला धक्काच बसला आहे.

‘ब्लू’ म्हणजे उत्साह

व्हिक्टोरिया आणि लुकाने त्यांच्या मुलीच्या जन्माआधीच तिचे नाव ‘ब्लू’ ठेवायचे ठरवले होते. ब्लू म्हणजेच निळा हा रंग सुंदर, उत्साह असा आहे. या रंगाचा संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचे या दांपत्याचे म्हणणे आहे. शिवाय ब्लूच्या जन्मानंतर तिची सगळी कागदपत्रे याच नावाने काढण्यात आली आहे. पासपोर्टपासूनची अन्य कागदपत्रे या नावाने असल्याचे देखील या दांपत्याने कोर्टात सादर केले. पण तरीदेखील नाव बदला असे सांगण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रपतींचाच नावात हस्तक्षेप

मिलानच्या राष्ट्रपतींनी नावाचा फतवा जारी केला असून मुलांची नावे ही योग्य असलीच पाहिजे असे यात म्हटले आहे. मिलान या देशाचा इतिहास पाहता येथील मुलांची नावे ही पुराणाशी निगडीत असायला हवी. त्यामुळे ब्लू, वर्दे (हिरवा) यांसारखी इंग्रजी नावे ठेवू नका असे देखील यात नमूद केले आहे.

अन्य सेलिब्रिटींची देणार उदाहरणे

व्हिक्टोरिया आणि लुका या दांपत्यामुळे ही बाब निदर्शनास आली असली तरी नाव बदलासाठी अनेकांना सांगण्यात आले असल्याचे देखील समोर आले आहे. विशेष म्हणजे इटलीतील काही मुलांची नावे मुलींना दिल्याने ती नावे देखील बदलण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या फतव्याविरोधात अनेक पालकांनी कोर्टात धाव घेतली असून अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या मुलांचे दाखले दिले आहेत. त्यामुळे नावात काय आहे? असे म्हणताना नावातच सगळं काही असल्याचे या इटलीच्या नव्या फतव्यात तरी दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -