घरदेश-विदेशपरेश रावल यांची निवडणुकितून माघार

परेश रावल यांची निवडणुकितून माघार

Subscribe

परेश रावल यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अद्याप भाजपकडून काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

भाजपचे नेते आणि बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला. परेश रावल यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अद्याप भाजपकडून काहीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परेश रावल २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. भाजपने आतापर्यंत २३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

- Advertisement -

परेश रावल यांनी आज सांगितले की, ‘मी चार-पाच महिने आधीच पक्षाला सांगितले होते की, मला निवडणुक लढवण्याची इच्छा नाही. मात्र याबाबतचा शेवटचा निर्णय पक्षाला घ्यायचा आहे. परेश रावल यांचे हे वक्तव्य त्यावेळी आले ज्यावेळी भाजपने आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आणि त्यामध्ये त्यांचे नाव आले नाही.

२०१४ च्या निवडणुकीत अभिनेता परेश रावल यांना ६ लाख ३३ हजार ५८२ मते मिळाली होती. परेश रावल यांनी काँग्रेसच्या हिंमतसिंह यांचा पराभव केला होता. गेल्या १० वर्षापासून अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलपासून मतदान होणार आहे. १९ मे ला शेवटच्या टप्प्यातले मतदान होणार असून एकूण ७ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. २३ मे ला मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -