घरताज्या घडामोडीकरोनामुळे संसद अनिश्चित काळासाठी तहकूब!

करोनामुळे संसद अनिश्चित काळासाठी तहकूब!

Subscribe

करोना विषाणूच्या फैलावामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून मागणी केली जात होती. नुकताच देशभरातील सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज तरी कसं सुरू ठेवणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसंच, करोनाग्रस्त झालेल्या कनिका कपूरच्या पार्टीमध्ये सहभागी झालेले भाजपचे खासदार दुष्यंत सिंह हे त्यानंतर थेट संसदेच्या कामकाजात सहभागी झाले होते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी संसदेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे. संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आता अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी करोनाचा प्रभाव कमी होऊन अधिवेशन पुन्हा सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.


हेही वाचा – केंद्र सरकारने जाहीर केला सर्व राज्यांत लॉकडाऊन!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -