घरदेश-विदेशपिंजऱ्यातून पोपट उडून गेला म्हणून मालकाने घेतला चिमुरडीचा जीव!

पिंजऱ्यातून पोपट उडून गेला म्हणून मालकाने घेतला चिमुरडीचा जीव!

Subscribe

पोपटाचा पिंजरा नकळत उघडाच राहिला आणि तो पोपट पिंजऱ्यातून उडून गेला

पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे आठ वर्षाच्या निरागस मुलीची हत्या करण्यात आली. घरात काम करणारी ८ वर्षांची मुलगी तिच्या मालकाच्या पोपटाचा पिंजरा साफ करत होती, याच दरम्यान पिंजराचा दरवाजा सैल झाला आणि पोपट पिंजराच्या बाहेर उडून गेला.

मालकानेच घेतला मुलीचा जीव

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मालकाला त्याच्या पिंजऱ्यातील पोपट उडून गेल्याने इतका राग आला की, त्याने त्याच्याकडे कामाला असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीचा जीवच घेतला. या घटनेची माहिती पाकिस्तानच्या लोकांना कळताच सर्वांनी संताप व्यक्त केला. दरम्यान आता सोशल मीडियावरून या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी देखील करत आहेत.

- Advertisement -

पिंजरा नकळत उघडाच राहिला आणि…

निरागस मुलगी रावळपिंडी येथे एका कौटुंबिक घरात काम करण्यास होती. ही घटना मागील रविवारीची असून जहरा ज्या कुटुंबात काम होती त्यांनी त्याच्या घरात एका पोपटाला पाळले होते. या घरात ८ वर्षांची जहरा साफसफाईची कामं करण्यास होती. रविवारी ती घऱातील पाळीव पोपटाचा पिंजरा साफ करत होती, यावेळी पोपटाचा पिंजरा नकळत उघडाच राहिला आणि तो पोपट पिंजऱ्यातून उडून गेला.

पोपट गेल्याने केली जबर मारहाण

घरातील पिंजऱ्यात असणारा आपला पोपट उडून गेल्याची माहिती मालकाला समजताच त्यांनी निष्काळजीपणाचा आरोप करत जाहराला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत चिमुकली जाहरा गंभीर जखमी झाली. त्यानंतर त्याला बेगम अख्तर रुखसाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जोडप्याला अटक केली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या चेहऱ्यावर, हाताला आणि पायांना जखमा आहेत. एफआयआरनुसार तिच्या मांडीवर जखमा देखील होत्या, ज्यामुळे मुलीवर लैंगिक गैरवर्तन केल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला नमुने पाठवले असून अहवाल येणे बाकी आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, या कुटुंबीयांनी मुलीने तिला कामावर ठेवण्यापूर्वी वचन दिले होते की तिला शिकवणार मात्र त्यांनी तिचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.


आठ वर्षात ७५० वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक वाघांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -