घरदेश-विदेशVideo: एका संडासमुळे झाले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!

Video: एका संडासमुळे झाले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!

Subscribe

विमानातील प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ ट्विटरवर केला शेअर

आतापर्यंत आपण दाट ढगांमुळे पुढील मार्ग दिसत नसल्याने किंवा आकाशातील दृश्यमानता कमी झाल्याने विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याचे पाहिले आहे. मात्र विमानातील संडासमुळे अचानक विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचा हा प्रकार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. वॉशिंग्टन डीसीहून सॅन फ्रान्सिस्कोला हे विमान जात होतं. याच विमानाचं बुधवारी डेन्व्हरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र इमर्जन्सी लँडिंग करण्याचे कारण तुम्हाला कळालं तर कदाचित तुम्हाला हसू येईल.

विमान प्रवास करत असताना एक प्रवासी विमानात असणाऱ्या संडासमध्ये अडकल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात प्रवास करणारा एक प्रवासी विमानातील वॉशरूममध्ये गेला होता. त्यावेळी तो तेथील संडासमध्ये गेल्यावर त्याचे दार आतून लॉक झाले. आत अडकून राहिल्याने प्रवासी घाबरला. त्याला बाहेर काढण्यासाठी काही लोकांनी मदत देखील केली. विमानातील प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

बघा हा व्हिडिओ

- Advertisement -

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संडासमध्ये अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी दोनजण प्रयत्न करताना दिसत आहे.

- Advertisement -

डेन्व्हरमध्ये या घटनेमुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर डेन्व्हर अग्निशमन विभागाला कळवत संडासमधील अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी बोलवण्यात आले. यानंतर अडकलेला प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या घडलेल्या प्रसंगानंतर युनायटेड एअरलाईन्स कडून वॉशिंग्टन डी.सी. पासून सॅन फ्रान्सिस्को १५५४ या विमानातील सर्व प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल तसेच गैरसोयीबद्दल
माफी मागण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -