घरदेश-विदेशधक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशी झाला नग्न

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशी झाला नग्न

Subscribe

दुबईहून लखनऊला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एक धक्कादायक प्रकार घडला असून एका पुरुष प्रवाशाने विमान हवेत असतानाच आपले कपडे काढून टाकले.

दुबई ते लखनऊ प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानत काल एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्रवाशांने विमान आकाशात असतानाच आपले कपडे काढले आणि विमानात फिरायला सुरुवात केली. या माथेफिरुचा हा प्रकार पाहून इतर प्रवाशी घाबरले. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ हालचार करत या माणसाला चादरीत गुंडाळले आणि त्याला एका जागी बसवले. या प्रवाशाने हे कृत्य का केले? याचे कारण मात्र अद्याप कळलेले नाही.

एअर इंडियाच्या फ्लाईट आयएक्स – १९४ या विमानाने १५० प्रवाशी प्रवास करत होते. या सर्वांसमोर या माथेफिरू प्रवाशाने हे कृत्य केल्यामुळे रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी लखनऊ येथे विमान उतरताच त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले.

- Advertisement -
हे वाचा – कोलकात्यात सापडला दुसऱ्या महायुद्धातील ४५३ किलोचा अवाढव्य बॉम्ब

विमानाच्या कॅप्टनने दिलेल्या निर्देशानंतर या प्रवाशाला विमानतळ सुरक्षा व्यवस्थेच्या हाती देण्यात आले. त्याने हे कृत्य का केले? याबद्दलचा तपास सुरु आहे, असे विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -