धक्कादायक! तापाच्या गोळ्या खाऊन करोनाग्रस्तांकडून तपासणी अधिकाऱ्यांची फसवणूक

mumbai

डॉक्टर आणि वैद्य यांच्यापासून काहीही लपवू नये असे म्हटले जाते. पण परदेशातून आलेल्या भारतीयांनी मात्र विमानतळावरील तपासणी अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. करोनाचा संसर्ग हा परदेशातून भारतात आला आहे. यामुळे बऱेच जण अंगात ताप असताना पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाऊन भारतात येत आहे. परिणामी विमानतळावर होणाऱ्या थर्मल चाचणीतून ते आरामात बाहेर पडतात. नंतर मात्र ते करोनाग्रस्त असल्याचे समोर येते. पण तोपर्यंत त्यांच्या संपर्कातील लोकांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर येते. यामुळेच देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी खळबळजनक माहिती उत्तर दिल्ली मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर राम यांनी दिली आहे.

जगभरात सुरू असलेला करोनाचा कहर बघून भारताने विविध देशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तेथून मायदेशी आणण्यास सुरुवात केली आहे. या नागरिकांची चाचणी करणारी प्रणाली देशातील २१ विमानतळावर बसवली आहे. यात प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजणारी थर्मल टेस्टही केली जात आहे. ज्यामुळे संबंधित व्यक्तीला ताप आहे की नाही ते कळते. जर ताप असेल तर त्या व्यक्तीला क्वारनटाईन केले जाते. हे टाळण्यासाठी परदेशातून येणारे नागरिक शकला लढवत आहेत. अंगात ताप असल्याचे भारतातील अधिकाऱ्यांना कळू नये म्हणून ते तापावरील गोळी पॅरासिटामॉल घेऊनच भारतात येत आहे. त्यामुळे थर्मल स्क्रिनिंग चाचणीत त्यांना काहीच समस्या नसल्याचे येते. चाचणीतून सुखरुप पार पडलेले हे नागरिक नंतर मोकाटपणे कुठेही फिरतात. त्याची लागण अनेकांना होते. त्यामुळे भारतात करोनाग्रस्तांची ंसख्या वाढत आहे.भारतात गेल्या तीन महिन्यात करोनाची लागण झपाट्याने झालेली पाहायला मिळते. असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here