घरदेश-विदेशपतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण एम्समध्ये दाखल

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण एम्समध्ये दाखल

Subscribe

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्या सोबत योग गुरु रामदेव बाबा उपस्थित आहेत.

पतंजली योगपीठाचे महामंत्री आणि योगगुरु बाबा रामदेव यांचे सहयोगी आचार्य बालकृष्ण यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयचात दाखल करण्यात आले आहे. हरिद्वारच्या योगपीठ येथील ऑफीसमध्ये त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना बेशूद्ध अवस्थेत योगपीठाजवळील भूमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पतंजली योगपीठ मॅनेजमेंटने याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भूमानंदव रुग्णालयात आचार्य बालकृष्ण यांची वैद्यकीय चाचणी झाली. त्यांची चाचणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘बालकृष्ण बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी काय शारीरीक त्रास होत आहे, याबाबत त्यांना काही सांगता येत नव्हते.’ भूमानंदव रुग्णालयातून त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आचार्य बालकृष्ण कोणालाही ओळखू शकत नाहीत

एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ब्रह्मा प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली आहे. बालकृष्ण सध्या कुणाशीही बोलू शकत नाहीत. ते सध्या काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल, अशी माहिती डॉ. ब्रह्मा प्रकाश यांनी दिली. सध्या बालकृष्ण यांना अतिदक्षता विभागात २४ तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचे एमआरआय आणि इतर चाचण्या झाल्या असून त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. त्यांना जेवनातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्या समवेत रामदेव बाबा उपस्थित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -