घरदेश-विदेशSushant Sucide Case : बिहार पोलिसांची फाईल तयार; मोठे मासे अडकण्याची शक्यता

Sushant Sucide Case : बिहार पोलिसांची फाईल तयार; मोठे मासे अडकण्याची शक्यता

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासासाठी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बिहार पोलिसांनी पुराव्याची भलीमोठी यादी तयार केली आहे. यामुळे रिया चक्रवर्तीसह अनेक मोठी मंडळी अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे पुरावे रियाच्या अटकेसाठी पुरेसे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पाटणामधून चार अधिकाऱ्यांची टीम मुंबईला आली होती. यामध्यो दोन पोलीस अधिकारी आणि हवालदार यांचा समावेश आहे. बिहार पोलिसाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी जेव्हा सहकार्य केले नाही आणि कागदपत्र देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी युक्ती लढवून या केसचा तपास सुरू केला.

रिया चक्रवर्तीसह आणखी काही बड्या लोकांची नावं बिहार पोलिसांनी बनवलेल्या फाईलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या आधारे त्यांच्या अटकेसाठी कोर्टात याचिका दाखल करता येउ शकते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या तिनही बँक अकाऊंट, यूपीआय पेमेंटचे स्टेटमेंट आणि चार्टर्ड अकाऊंटच्या लेजर बॅलेन्सची कॉपी टीमने पुराव्यासाठी ठेवली आहे. रिया आणि सुशांतमध्ये झालेल्या बँक खात्यातील पैशांची देवाण-घेवाण हीच साधारण ४८ पानांची झाली आहे. त्याशिवाय १३ पानं सुशांत आणि त्यांची आधीची प्रेयसी अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या स्क्रीनशॉटचे आहेत. दरम्यान, सहा जणांचे जबाब रेकॉर्ड करून घेतले असून एक मुख्य साक्षीदाराशी फोनवरून संवाद साधून त्याचे कागदपत्र तयार केले गेले आहेत. बिहार पोलीस टीमने खुपसारे साक्षी पुरावे या केससंबंधी गोळा केले असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. याच्या आधारे आरोपींना अटक करता येऊ शकेल.

- Advertisement -

हेही वाचा –

Ayoddhya Ram Mandir : हे सारं न भूतो, न भविष्यती आहे – नरेंद्र मोदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -