घरदेश-विदेशNobel Prize 2020 : पॉल मिल्ग्रोम, रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

Nobel Prize 2020 : पॉल मिल्ग्रोम, रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

Subscribe

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार पॉल आर. मिल्ग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना घोषित करण्यात आला आहे. लिलावाची तत्त्वे आणि लिलावाच्या नव्या प्रारुपाच्या शोधासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मिल्ग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांची नोबेलासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी MIT आणि हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांना अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते. त्यावेळी तब्बल ११ लाख अमेरीकन डॉलर्स इतकी रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांचा समावेश होता. तसेच आमर्त्य सेन यांना 1998 साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, २०२० च्या वैद्यकीय विभागातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे हार्वे जे अल्टर, चार्ल्स एम राईस आणि ब्रिटिश संशोधक मायकल ह्यूटन यांना देण्यात आला आहे. तर भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा ३ शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या ३ शास्रज्ञांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे. रसायनशास्त्रातील (केमिस्ट्री) यंदाचा नोबेल पुरस्कार दोन महिला वैज्ञानिकांना मिळाला आहे. इमानुएल शॉपोंतिये (फ्रान्स) आणि जेनिफर ए डुडना (अमेरिका) असं या संशोधकांचं नाव आहे. अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा –

बत्ती ऑन आणि पाणी गॉन; मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मंगळवारी ‘इफेक्ट’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -