घरदेश-विदेश२ हजार रुपये द्या आणि निवांत झोपा!

२ हजार रुपये द्या आणि निवांत झोपा!

Subscribe

या भन्नाट 'नॅप स्टोअर'मध्ये तुम्हाला शांत झोप मिळेल अशा सर्व सोयी पुरवण्यात आल्या आहेत. इथल्या इंटिरिअरपासून ते अन्य सुविधांपर्यंत सर्व गोष्टी तुमच्या झोपेला पुरक अशाच आहेत.

आजकाल पैसे खर्च केले की सगळं काही विकत घेता येतं असं म्हणतात. तुमची पैसे खर्च करण्याची असेल तर तुम्ही जगातली कोणतीही वस्तू किंवा सुविधा विकत घेऊ शकता. मात्र, शांत झोप मिळावी यासाठी कोणी हजारो रुपये खर्च करत असेल तर? किंवा तुम्हाला कुणी सांगितलं की अशाप्रकारे पैसे घेऊन शांत झोप देणारं एक दुकान अस्तित्वात आहे तर? प्रसंगी यावर तुमचा विश्वास बसणार नाही किंवा ‘झोप विकणारं दुकान‘ ही संकल्पनाच तुम्हाला काल्पनिक वाटेल. मात्र, जगाच्या पाठीवर खरोखरंच असं एक ‘नॅप स्टोअर‘ आहे. जिथे चक्क तुम्हाला झोप विकली जाते. याठिकाणी २५ डॉलर्स म्हणजेच सुमारे १७५० ते १८०० रुपये, इतकी फी घेऊन तुम्हाला ४५ मिनिटांची शांत झोप दिली जाते. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये ‘कॅस्पर’ नावाचं हे खास नॅप स्टोअर आहे. तुम्हाला शांत झोप मिळेल अशी सर्व सोय या नॅप सेंटरमध्ये करण्यात आली आहे. इथल्या इंटिरिअरपासून ते अन्य सोयी-सुविधांपर्यंत सर्वच गोष्टी तुमच्या झोपेला पुरक अशाच आहेत.

sleeping store
प्रातिनिधक फोटो

आरामदायी सुविधांचा समावेश

दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, या नॅप स्टोअरमध्ये सर्व आरामदायी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. इथल्या छताचे डिझाईन रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या आकाशासारखे करण्यात आले आहे. यामुळे पलंगावर झोपल्यानंतर तुम्ही जेव्हा वरती पाहता तेव्हा तुम्हाला आकाशात लुकलुकणारे शांत तारे दिसतात. याशिवाय इथे असलेल्या ९ वेगवेगळ्या केबिन्समध्ये अतिशय मऊ गाद्यांचे पलंग देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी तुम्हाला निवांत झोप मिळू शकते. याशिवाय झोपण्याच्या कम्पार्टमेंट्समध्ये मंद अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच तुमच्या डोळ्यावर अलगद झोप येते. एकंदरच आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्यांच्याकडे पैसा आहे पण झोपायला वेळ नाही, असे लोक नक्कीच या नॅप स्टोअरला भेट देऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -