घरदेश-विदेशगावकऱ्यांची सेल्फी बेतली मोराच्या जिवावर

गावकऱ्यांची सेल्फी बेतली मोराच्या जिवावर

Subscribe

सेल्फी काढणे हे आता सर्व वयोगटातील लोकांचे व्यसन झाले आहे. या सेल्फीच्या व्यसनामुळे पश्चिम बंगालमधील जलपैगुरी गावात एका मोराला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. आता तुम्ही म्हणाल सेल्फी आणि मोर यांचा काय संबंध? तर झाले असे की जलपैगुरी या गावात मोर पक्षी आला होता. मोरा सोबत सेल्फी काढण्यासाठी गावकाऱ्यांनी एकच गर्दी केली. आपला सेल्फी झक्कास यावा म्हणून गावकरी विविध पद्धतीने पोझ देत सेल्फी काढत होते. गावकऱ्यांच्या या सेल्फीछंदात मोराचे मात्र प्रचंड हाल झाले. काहींनी मोराचे पाय, पंख तर काहींनी त्याची पिसे देखील ओढली. यामुळे मोर जखमी झाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आता पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या वॉर्डन सीमा चौधरी यांनी दिली.

प्राण्यांसोबत सेल्फी काढणे धोक्याचे?

प्राणी म्हटलं की आपण त्यांना जवळ घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र पक्षी आणि प्राण्यांच्या जवळ जाऊन सेल्फी काढणे त्या प्राण्यांसाठी आणि मानवासाठी धोक्याचे असते. याआधी देखील एका अस्वलासोबत फोटो काढताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या एका घटनेत एका व्यक्तीने हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हत्तीने केलेल्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. साप, मगर आणि इतर प्राण्यांच्यासोबत सेल्फी काढण्याच्या नादापाई अनेकवेळा अशा घटना घडल्याचे वृत आपण वाचत असतो, पाहत असतो. मात्र अशा घटनांमधून कोणीही धडा घेत नाही.

- Advertisement -

सेल्फी काढणे म्हणजे एक प्रकारचे व्यसन बनले आहे. आजकाल सर्वच वयातील व्यक्ती सेल्फीकरता कोणत्याही थराला जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे सेल्फी काढणे हा एक आजार आहे असेही काही दिवसांपूर्वी एका अहवालात नमूद करण्यात आले होते.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -