अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी पेन्शन योजना

उत्तराखंड सरकारची मोठी घोषणा

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांचा ‘छपाक’ १० जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आणि नंतरही चित्रपटबाबत वाद सुरू आहेत. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर उत्तराखंड सरकारने महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. दीपिकाच्या ‘छपाक’ने प्रेरित होत उत्तराखंड सरकारने अ‍ॅसिड अ‍ॅटॅक पीडितांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

उत्तराखंडमध्ये जवळपास १० ते ११ ऍसिड अटॅक पीडिता आहेत, त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पीडितांना प्रत्येक महिन्याला ५ ते ६ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. मंत्री रेखा आर्य यांनी याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचेही सांगितले.

छपाकला चांगला प्रतिसाद

सत्य घटनेवर आधारित ‘छपाक’ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. चित्रपटातील दीपिकाच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे. ‘छपाक’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४. ७७ कोटींची कमाई केली होती. तर दुसर्‍या दिवशी चित्रपटाच्या कमाईने ६.९० कोटींचा आकडा गाठला. दोन दिवसांत ‘छपाक’ने जवळपास ११.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here