Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ; पोट भरण्यासाठी खातायत उंदीर आणि साप

लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ; पोट भरण्यासाठी खातायत उंदीर आणि साप

Related Story

- Advertisement -

म्यानमारमध्ये मार्चमध्ये प्राणघातक कोरोना विषाणूची पहिली लाट पसरली होती त्यांनतर लॉकडाऊन करण्यात आला. मा सु (३६) यांना खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी त्यांचं कोशिंबीर स्टॉल बंद करावा लागला आणि दागिने तारण म्हणून ठेवावे लागले. लॉकडाऊनमध्ये दुसऱ्यांदा मा सू यांना आपला स्टॉल बंद करावा लागला आणि कपडे आणि भांडी विकावी लागली. जेव्हा त्यांच्याकडे विकण्यासाठी काहीच नव्हतं तेव्हा झोपडपट्टीतील गटारात खाण्यासाठी शोध घेऊ लागले. लोकांकडे काहीच खायला नव्हतं, त्यामुळे ते उंदीर आणि साप मारुन खात आहेत.

म्यानमारमधील यांगून शहरातील ही धक्कादायक घटना आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगभरात लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यांगूनमध्ये राहणारे लोक उंदीर आणि साप खात पोट भरत आहेत. म्यानमारमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजाराच्या पार गेला आहे. तर १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेकडो लोक बेरोजगार झाले आहेत. स्थानिक प्रशासन ने मीन तुन म्हणाले की, त्यांच्या भागातील ४० टक्के लोकांना मदत दिली गेली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीस भारताचे लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे (Army Chief General MM Naravane) आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्यानमारचे नेते आंग सॅन सू ची (Aung San Suu Kyi) यांना ‘रेमडेसिवीर’ औषध दिलं (Remdesivir medicine). जनरल नरवणे आणि श्रृंगला दोन दिवसांच्या म्यानमार दौर्‍यावर होते. या भेटीचा उद्देश संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक क्षेत्रात संबंध वाढविणे हे आहे. म्यानमार सरकार देशातील लोकांना जास्तीत जास्त मदत देत आहे.

 

- Advertisement -