घरदेश-विदेशपोलीस भरती परीक्षेत पकडले तीस बोगस उमेदवार

पोलीस भरती परीक्षेत पकडले तीस बोगस उमेदवार

Subscribe

मंगळवारी उत्तर प्रदेशातील एसटीएफने मेरठमधील पोलीस भरती परीक्षा केंद्रावर छापा मारून तोतया २२ उमेदवारांना पकडले. एकूण ३० लोकांना पकडण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ आणि फैजाबादमध्ये झालेल्या पोलीस भरती परीक्षेत उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफनं सोमवार आणि मंगळवारी तीस बोगस उमेदवारांना पकडलं आहे. मंगळवारी मेरठमध्ये झालेल्या परीक्षेत २२ बोगस उमेदवारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं, तर फैजाबादमध्ये पोलिसांनी आठ बोगस उमेदवारांना पकडलं. उत्तर प्रदेशमध्ये १८ आणि १९ जूनला पोलीस भरती परीक्षा घेण्यात आली होती. सोमवारी पहिल्याच दिवशी गोरखपूर आणि अलाहाबादमधून मोठ्या संख्येनं बोगस उमेदवारांना पकडण्यात यश आलं होतं.

टोळीच्या म्होरक्याकडून १० लाख सापडले

मंगळवारी उत्तर प्रदेशातील एसटीएफने मेरठमधील पोलीस भरती परीक्षा केंद्रावर छापा मारून तोतया २२ उमेदवारांना पकडले. एसटीएफनं दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा मुख्य २०१५ मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये निवडून आला होता. काही व्यक्तींना एसटीएफनं कंकरखेडामधून अटक केली. या लोकांकडून साधारण १० लाख रुपये मिळाले असून प्रत्येक तोतया उमेदवाराला ४ लाख देण्यात आल्याची माहिती एसटीएफनं दिली आहे. याव्यतिरिक्त या टोळीकडून २६ मोबाईल आणि तीन गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तोतयांपैकी ८ जण हरियाणातील असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

कुठे करण्यात आली अटक?

ही अटक अयोध्या कोतवाली क्षेत्रामधील साकेत महाविद्यालय, कृष्णा गेस्ट हाऊस आणि कोतवाली नगर क्षेत्र गुरुनानक अकॅडमीमधून करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांना ३३ उमेदवारांचं प्रवेशपत्र, ३ उमेदवारांच्या परीक्षा उत्तरपत्रिका, १८ आयडी कार्ड्स, ५१ उमेदवाराचे फोटो, एटीएम कार्ड, ६ मोबाईल, ६ रेल्वे तिकीट, ५५१० रुपये आणि ३० उमेदवारांकडून सॉल्व्हर सूचीच्या तीन फोटोकॉपी मिळाल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्व सॉल्व्हर गोरखपूर आणि बिहारमधील असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -