घरदेश-विदेशलोकांनी दरोडेखोरांनाच लुटले, चोरी रक्कम घेऊन जातांना घडला प्रकार

लोकांनी दरोडेखोरांनाच लुटले, चोरी रक्कम घेऊन जातांना घडला प्रकार

Subscribe

बँकच्या एटीएममधून ४० लाखांची लुट करून पसार होणाचा प्रयत्न करणाऱ्या चोरांचे पैसे लोकांनीच लुटल्याची घटना घडली आहे. नोएडा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

बँकेच्या एटीएममधून पैसे चोरून पसार झालेल्या चोर हे लोकांचे पैसे घेऊन जातात. याचा परिणाम बँकेवर होतो. बँकेत असलेले लोकांचे पैसे या चोरांकडून पळवण्याच्या घटना आपल्या समोर नेहेमी येत असतात. मात्र बँकेचे पैसे पळवणाऱ्या चोरांना लोकांनीच लुटले असल्याची वेगळीच घटना नुकतीच समोर आली आहे. बँकेच्या एटीएममधून पैसे चोरून बाईक वरून पसार होण्याच्या प्रयत्नात बाईक घसरली. या घटनेत चोरांनी लुटलेले पैसे रस्त्यावर पसरले. लोकांनी या दोघांना वाचवण्या ऐवजी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. लोक आपले पैसे घेऊन जात असल्याचे बघून यापैकी एका चोराने बंदूकेने हवेत गोळी झाडली. यानंतर उरलेले पैसे घेऊन हे चोर पसार झाले. मात्र पोलिसांनी या चोरांना ओळखून त्यांना अटक केले आहे. या चोरांकडून १९.६५ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले. उर्वरित रक्कम लोकांनी लंपास केली असल्याची माहिती या चोरांनी पोलिसांनी दिली आहे.

कसा घडला प्रकार

नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील सेक्टर ८२ मध्ये असलेल्या एसबीआय एटीएम मशीन मध्ये का प्रकार घडला. या एटीएम मशीनमध्ये दुपारच्या वेळी बँकेच्या कॅश व्हॅनने पैसे भरले होते. पैसे भरल्यानंतर काही वेळात या दोन चोरांनी एटीएम फोडून ४० लाखांची रक्कम काढली. ही रक्कम घेऊन पळ काढत असताना दुपारी १.३० च्या सुमारास यांची बाईक घसरली. जवळ असलेल्या बॅगेतील पैसे रस्त्यावर पडत गेले. अचनाक झालेल्या अपघातामुळे या ठिकाणी लोकांची गर्दी जमली. मात्र लोकांनी या दोघांना उचलण्या ऐवजी पैसे उचलले. घटनेनंतर या दोन्ही चोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -