आकाशात उडणारा ‘एलियन’ बघून लोकं घाबरले; पाहिले तर निघाला…

आकाशात उडणारा कोणताही एलियन नसून आयर्न मॅनच्या आकाराचा फूगा आकाशात उडत होता. सत्यतेची शहाःनिशा केल्यावर गावातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडात स्थानिकांनी आकाशामध्ये एक विचित्र प्रकार पाहिला तेव्हा स्थानिक लोक घाबरून गेले. आकाशात एलियनसारखी गोष्ट पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. घाबरलेल्या आवस्थेत लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्वरित पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तपासणी केल्यानंतर असे समोर आले की, आकाशात उडणारा कोणताही एलियन नसून आयर्न मॅनच्या आकाराचा फूगा आकाशात उडत होता. सत्यतेची शहाःनिशा केल्यावर गावातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.

असा घडला प्रकार

शनिवारी पहाटे दनकौर परिसरातील आकाशात लोकांनी ही वस्तू पाहिली आणि नंतर भट्टा परसौल गावाजवळील कालव्यात ही वस्तू आकाशातून पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याठिकाणी आजूबाजूला लोकांचा जमाव जमला आणि काही लोकांना असे वाटले की हा कोणता तरी परग्रहावरचा प्राणी आहे.

फूग्याला स्थानिकांनी समजले एलियन

दनकौरचे पोलिस स्टेशन प्रभारी अनिल कुमार पांडे यांनी सांगितले की, हा हवा भरलेला फूगा होता. जो नंतर आकाशातून एका कालव्याजवळील झुडुपात अडकला होता. ते म्हणाले, “फूग्याचा एक भाग कालव्याच्या वाहत्या पाण्याला स्पर्श करत होता, ज्यामुळे फूगा पाण्याच्या प्रवाहाने हलत होता.” पांडे म्हणाले की फूग्यामध्ये काहीही हानीकारक नव्हते, परंतु हा फूगा कोणी आकाशात उडविला होता, हे अद्याप कळू शकले नाही.


देशात कोरोना फैलाव नियंत्रणात; परंतु थंडीत दुसरी लाट येण्याची शक्यता!