घरदेश-विदेशचहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह असतात; संशोधकांचा दावा

चहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह असतात; संशोधकांचा दावा

Subscribe

चहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह आणि स्पष्ट विचारांचे असतात, असा दावा चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका अभ्यासकांनी मांडला आहे.

सकाळ झाली का सुरुवात होते ती एका चहाच्या घोटाने. तसेच कोणत्याही वेळी चहा विचारल्यानंतर बरीच मंडळी हो चहा हवा असे देखील उत्तर देतात. त्याचप्रमाणे चहा हे भारतामधील सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आहे. मात्र सध्याची तरुण पिढी चहा पित नाही. मात्र ज्या व्यक्ती चहा पितात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चहा प्यायल्याने एकाग्रता वाढते ज्यामुळे मनामधील अनेक गोष्टींबद्दलचे विचार अधिक स्पष्ट होतात, असं एका अभ्यासामध्ये समोर आले आहे. चीनमधील पेकिंग विद्यापिठामधील एका अभ्यासानंतर हा निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला आहे.

चहामधील या घटकांमुळे व्यक्ती सतर्क आणि सजग राहते

राजधानी बिजिंगमधील पेकिंग विद्यापिठामधील अभ्यासकांनी केलेल्या संशोधनामध्ये चहामधील कॅफीन आणि थेनीनचा मेंदूमधील क्रिएटीव्ह विचारशक्तीशी कसा संबंध आहे याबद्दलही अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे. या अभ्यासामध्ये असे समोर आले आहे की, चहा प्यायल्यानंतर लगेचच व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात असंही या अभ्यासा नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

असा करपण्यात आला प्रयोग

मानसोपचारतज्ञांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ५० विद्यार्थ्यांच्या मदतीने काही प्रयोग करुन पाहिले. यामध्ये सरासरी २३ वर्ष वयोगट असणाऱ्या या दोन्ही गटांमधील एका गटातील विद्यार्थ्यांना पाणी दिले तर दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना कोरा चहा देण्यात आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांची क्रिएटीव्हिटी पाहण्यासाठी त्यांना ठोकळे देऊन त्यांना आकर्षक आकाराच्या इमारतींची रचना तयार करण्यास आणि हॉटेल्साठी नावे सुटवण्याचे सांगण्यात आले. त्यांनी तयार केलेली रचना आणि नावांवरुन चहा पिणाऱ्या विदार्थींचे विचार हे अधिक क्रिएटीव्हि आणि आकर्षक असतात, असा निष्कर्ष मानसोपचारतज्ञांनी काढला आहे. तसेच एखादी व्यक्ती किती चहा पिते यावर तिचे विचारही क्रिएटीव्ह आहेत हे ठरतं, असेही ते म्हणाले आहेत. मात्र चहा हा जरी विचारशक्तीसाठी चांगला असला तरी अतीसेवन धोकादायक असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

या अभ्यासामधील सर्व निष्कर्ष ‘फूड क्वॉलिटी अँड प्रेफरन्स जर्नल’मधील एका विशेष लेखामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच मानवी आकलनशक्ती आणि अन्नपदार्थांमधील संबंधांसंदर्भातील अभ्यासाठी याची मदत होईल असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा – उकळता चहा पिता तर हे नक्की वाचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -