घरट्रेंडिंगमोदींनी मागितल्या सूचना, लोकांनी मांडलं समस्यांचं गाऱ्हाणं!

मोदींनी मागितल्या सूचना, लोकांनी मांडलं समस्यांचं गाऱ्हाणं!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वातंत्र्यदिनानिमित लाला किल्ल्यावरुन देशातल्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. मोदींनी यावेळी काय बोलावे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष वेधायला हवे, यासाठी पंतप्रधान कार्यालयाने भारतीयांना काही मुद्दे व सूचना देण्याची विनंती केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ९००० लोकांनी मोदींचे विविध गोष्टींकडे लक्ष वेधले आहे.

उद्या भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा केला जाणार. या दिवसाच्या निमित्ताने दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन देशाचे पंतप्रधान देशवासियांना संबोधित करतात. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा स्वातंत्र्य दिनी लाला किल्ल्यावरुन भाषण करणार आहेत. यांनी भाषणात कोणते मुद्दे मांडावेत, कोणत्या भूमिका मांडाव्या, देशातील कोणत्या समत्यांकडे लक्ष द्यावे,देशवासियांना काय सांगावे याबाबत लोकांकडून मते मागवली आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबतची माहिती पोस्ट अपलोड करण्याची विनंती पंतप्रधान कार्यालयाने केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद देत आतापर्यंत ९ हजार १२९ लोकांनी मोदींना काही सल्ले दिले आहेत. त्यामध्ये लोकांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्था नीट नसल्याचे नमूद केले आहे. महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

पहा काय म्हणतायत भारतीय

देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने आणि दंगलींमुळे सार्वजनिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आंदोलकर्त्यांकडून त्याची नुकसानभरपाई करुन घ्या. जो यास नकार देईल त्याची संपत्ती जप्त करा. त्यामुळे लोक पुढच्या वेळी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यापूर्वी विचार करतील
– अंगद कहार

- Advertisement -

देशभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. देशभरात अनेक ठिकाणी खाकीचा दुरुपयोग होतो. त्याला आळ बसवा
– पंकज पाटील

देशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न होणे अपेक्षीत आहे. काही महिन्यांच्या अर्भकांवरदेखील बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यात यावी, त्यामुळे अशा लोकांना आळा बसेल
– आशिश शुक्ला

- Advertisement -

अनेकांनी देशाच्या सीमाप्रश्नांकडे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचा बंदोबस्त करावा, देशाच्या सीमा सूरक्षीत कराव्या, रोजगार उपलब्ध करणे, डॉलरच्या तूलणेत रुपया ढासळला असल्याने रुपयाचे मूल्य वाढवण्यासाठी प्रयत्ना व्हायला हवेत, अशी इच्छादेखील अनेकांनी व्यक्त केली आहे.
 – कुमार

देशात महिलांची सुरक्षा ही गंभीर बाब बणत चालली आहे. महिलांवरी अत्याचार थांबावेत यासाठी नवे आणि कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे. स्त्रीभ्रूण हत्या थांबाव्यात यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अत्याचार पीडित महिलांना न्याय द्या
– राजशेखर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -