घरट्रेंडिंगत्याला आवडायचा जेम्स बॉण्ड, पठ्ठ्यानं कहरच केला!

त्याला आवडायचा जेम्स बॉण्ड, पठ्ठ्यानं कहरच केला!

Subscribe

माय नेम इज बॉण्ड…जेम्स बॉण्ड! हा डायलॉग आपल्यापैकी बहुतेकांना झोपेत विचारला तरी तो तोंडपाठ म्हणता येईल. जेम्स बॉण्ड या गुप्तहेराच्या व्यक्तिरेखा जगप्रसिद्ध करणाऱ्या बॉण्डपटांची क्रेझ लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आहे. किमान दोन पिढ्यांना या बॉण्डपटांनी वेड लावलं. पण तुम्हाला जर सांगितलं की दिल्लीमध्ये थेट नावानिशी खराखुरा बॉण्ड अवतरला आहे तर? ही अजिबात अतिशयोक्ती नसून हे सत्य आहे. जसं तुमचं-आमचं सगळ्यांचं नाव असतं, तसंच दिल्लीतल्या एका व्यक्तीनं त्याच्या बॉण्डप्रेमाचं प्रतिक म्हणून चक्क स्वत:चं नावच बदलून जेम्स बॉण्ड (James Bond) ठेवलं आहे. त्यामुळे आता कुणीही त्याला नाव विचारलं तर तो दिमाखात म्हणतो आय एम जेम्स बॉण्ड!

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीमध्ये राहणारा ३३ वर्षीय विकास कर्दम जेम्स बॉण्ड आणि बॉण्डपटांचा प्रचंड चाहता आहे. त्याचं बॉण्ड प्रेम इतकं टोकाचं होतं की त्यानं चक्क आपलं नाव बदलून जेम्स बॉण्ड करून घेतलं. आणि हे फक्त सांगण्यासाठी म्हणून नव्हे बरं का! त्यानं आपलं नाव कागदोपत्री जेम्स बॉण्ड करून घेतलं आहे! त्याच्या मित्रपरिवाराने त्याला हा नाद सोडायला लावायचा खूप प्रयत्न केला. पण हा पठ्ठ्या काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्याचं नाव कागदपत्रांवर जेम्स बॉण्ड झालं!

- Advertisement -

तुमच्या नावापुढे बॉण्ड आडनाव लागलं तर?

विकास कर्दमचं असं म्हणणं आहे की त्याचं नवीन नाव त्याच्या पर्सनॅलिटीला सूट होणारं आहे. पश्चिम दिल्लीच्या नेवाडा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये एका दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात तो राहातो. पण त्याच्या या निर्णयामुळे आता त्याची पत्नी लोकांच्या हेटाळणी आणि मस्करीच्या शक्यतेमुळे प्रचंड नाराजीत आहे असं देखील कळतंय. या महाशयाचा हा पराक्रम ऐकून पत्नीने दोन दिवसांपासून त्याच्याशी बोलणं देखील टाकलंय. आणि आता ती आपल्याशी काहीही संवाद करत नाही असं त्याचं म्हणणंय. आता याच्या नावात जेम्स आहे म्हणून पुढच्या बॉण्डला अर्थ आहे. पण इतर सामान्य नावांच्या पुढे आडनाव म्हणून बॉण्ड लावलं तर ते किती भयंकर वाटेल, तुम्हीच प्रयत्न करून पाहा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -