घरट्रेंडिंग'या' महान माणसाला दंडवतच घालायला हवा!

‘या’ महान माणसाला दंडवतच घालायला हवा!

Subscribe

घरातल्या विंडो स्लायडिंगची पट्टी तुटली म्हणून एका महाभागानं त्या आकाराची शॉपिंगची लिस्ट तयार होईपर्यंत खरेदी केली आहे!

भारतात कोणे एकेकाळी मोहम्मद बिन तुघलक नावाचा मुघल राजा होऊन गेला. ज्याच्या लहरी निर्णयांमुळे त्याच्या नावावरून अशा लहरी महाभागांना ‘लहरी मोहम्मद’ म्हणण्याची प्रथा रुढ झाली. पण असे लहरी मोहम्मद फक्त भारतातच नाहीत, तर पार सातासमुद्रा पार तिकडे अमेरिकेतसुद्धा आहेत बरं का! तिथल्या अशाच एका महाभागाने केला प्रताप सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बरं, या महाभागाने त्याने केलेला प्रताप स्वत:च ट्विटवर टाकला आहे. त्यामुळे त्याच्या हुशारीवर हसावं की त्याच्या मूर्खपणावर रडावं असाच प्रश्न त्याच्या घरच्यांना पडला. आता तुम्ही म्हणाल की नक्की काय केलंय या महाभागानं?

खरेदीच्या लिस्टने झाकली काच!

तर या महाभागाचं नाव आहे अॅण्ड्र्यू नोलन. अॅण्ड्र्यू राहणारा अमेरिकेतल्या ओहियो प्रांतातला. मागच्या आठवड्यात म्हणजे साधारण ४ डिसेंबरच्या आसपास अॅण्ड्र्यूच्या घरी बेडरुमच्या खिडकीच्या स्लायडिंगची एक पट्टी तुटली. आता ही पट्टी तुटल्यावर सामान्यपणे आपण संबंधित कारागिराला गाठतो आणि त्याच्याकडून ती पुन्हा बसवून घेतो. पण या महाशयांनी थेट ओहियोमधलं सीव्हीसी नावाचं स्टोअर गाठलं आणि त्या पट्टीच्या मापाची लिस्ट तयार होईपर्यंत खरेदी सुरू ठेवली. शेवटी जेव्हा तेवढी मोठी लिस्ट त्याच्या हातात पडली, तेव्हा त्यानं ते बिल थेट त्या पट्टीच्या जागेवर लावून ती खिडकी झाकली.ॉ

- Advertisement -

हे एकदा वाचा – नेटफ्लिक्स, अॅमेझॉनमुळे ‘त्याने’ गमावली नोकरी

खरेदीही केली आणि ट्विटही केलं!

वास्तविक पाहाता त्यानं आधी ही खरेदी केली आणि नंतर तुटलेल्या पट्टीच्या जागेवर हे बिल चिटकवलं. पण त्याच्या खरेदीची लिस्टच एवढी मोठी होती, की ती थेट त्या पट्टीच्या आकाराची झाली. त्यामुळे त्यानं हे बिल त्या पट्टीवर चिटकवलं आणि तो फोटो ट्विटरवर टाकून त्याच्याखाली कॅप्शन देखील टाकली.

- Advertisement -

पोस्ट ट्विटरवर तुफान व्हायरल

अॅण्ड्र्यूचं हे ट्विट नेटिझन्सनी चांगलंच उचलून धरलं आहे. त्याच्या या ट्विटला तब्बल ५६ हजार ७५० रिट्विट मिळाले आहेत. तर २ लाख ५४ हजार लाइक्स मिळाले आहेत. १ हजार तर नुसत्या कॉमेंट आहेत. त्यामुळे ‘इंटरनेटवर काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही’, असे संवाद आपण अनेकदा ऐकत असतो. पण अशा काही घटनांमुळे त्याचे पुरावेच आपल्याला मिळतात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -