घरदेश-विदेशकिटकनाशक फवारणी टिम पुढच्या आठवड्यात केरळात दाखल – आरोग्यमंत्री

किटकनाशक फवारणी टिम पुढच्या आठवड्यात केरळात दाखल – आरोग्यमंत्री

Subscribe

केरळमधील पुरग्रस्त भागात कीटकजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये, यासाठी महाराष्ट्रातून किटकनाशक फवारणी टिम पाठवण्यात येणार आहे. ही टीम पुढच्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होणार आहे.

केरळमधील पूर प्रभावित भागात कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी धूर फवारणी यंत्रासह फवारणी कर्मचाऱ्यांचे पथक पुढच्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होणार आहे. त्याचबरोबर पुरग्रस्त केरळ राज्याला अत्यावश्यक असणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब अशी जीवरक्षक विविध प्रकारची औषधे, पिण्याचे पाणी शुद्ध करणारे मेडिक्लोअर औषधांचा साठा देखील आरोग्य विभागाच्या पथकाकडून सोमवारी सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

औषधांचा साठा सुपूर्द

गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा टिचर यांची भेट घेतली होती. त्यावेळी केरळला इन्सुलिन, रक्तदाब अशा आजारांवर जीवरक्षक औषधांची गरज असल्याचे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यावेळी डॉ. सावंत यांनी जीवरक्षक औषधाबरोबरच पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी मेडिक्लोअर बाटल्यांचा साठा पाठवणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने आज त्रिवेंद्रम येथे जाऊन केरळ मेडिकल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे औषधांचा साठा सुपूर्द केला आहे.

- Advertisement -

८६ प्रकारची औषधे पाठवण्यात आली

केरळच्या दौऱ्यावरुन आल्यावर आरोग्यमंत्र्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन केरळला आवश्यक असणाऱ्या औषधांची यादी दिली. त्यानुसार औषधे आणि बहुपयोगी आरोग्य कर्मचारी केरळ येथे पाठवण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, सोमवारी त्रिवेंद्रम येथे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केरळ मेडिकल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक नवज्योत खोसा यांची भेट घेतली. यावेळी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार या वरील ८६ प्रकारची वेगवेगळी औषधे तसेच पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, मेडिक्लोअर बॉटल्स यांचा साठा केरळच्या आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आला. शिवाय, केरळमधील पुरग्रस्त भागात कीटकजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये, यासाठी महाराष्ट्रातून फवारणी कर्मचाऱ्यांचे पथक केरळमध्ये पाठवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -