घरदेश-विदेशदुधापेक्षा बियर पिणे फायदेशीर; पेटाचा दावा

दुधापेक्षा बियर पिणे फायदेशीर; पेटाचा दावा

Subscribe

दुधापेक्षा बिअरचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो, असा दावा पेटातून करण्यात आला आहे.

बऱ्याचदा मद्यसेवन करणे हे आरोग्याला हानीकारक आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे मद्यसेवन न करण्याचा देखील सल्ला दिला जातो. त्याचबरोबर अनेकदा दूधाचे सेवन करा. दूध प्यायल्याने कसा फायदा होतो, हेही सांगितले जाते. मात्र, पेटा (पीपल फॉर अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल) ने केलेल्या एका अजब दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. बियर पिणे हे दूध पिण्यापेक्षा चांगले आहे, असा अजब दावा ‘पेटा’ने एका रिपोर्टमध्ये केला आहे.

बिअर प्यायल्याने होतो फायदा

शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी बऱ्याचदा दूधाचे सेवन करण्याचा लहानपणापासूनच सल्ला दिला जातो. यामुळे शरीलाला बळकटी मिळते. त्याचबरोबर शरीर सुदृढ देखील राहते, असे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र, पेटाने केलेल्या दाव्यानुसार दूध पिण्यापेक्षा बियर पिणे आरोग्यदायी आहे.

- Advertisement -

बिअर प्यायल्याने आयुष्य वाढते

बियर प्यायल्याने केवळ हाडे मजबूत होत नाही तर बियर पिणाऱ्या व्यक्तींचे आयुष्यही वाढते. त्यामुळे दूध न पिण्याचा सल्ला पेटाने दिला आहे. दूध प्यायल्याने शारीरिक नुकसान होत असल्याचेही पेटाने म्हटले आहे. गायीचे दूध प्यायल्याने व्यक्ती लठ्ठ होतात. डायबिटीज तसेच कॅन्सर यासारखा गंभीर आजार होऊ शकतो, असेही पेटाने म्हटले आहे. त्यामुळे दूध न पिता बिअरचे सेवन करावे, असा दावा करण्यात आला आहे. बियरमुळे व्यक्तीची हाडे मजबूत होतात. शरिरातील मांसपेशींच्या विकासासाठी हे फार फायदेशीर आहे. तसेच दररोज दूध प्यायल्याने हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीज आणि कॅन्सर यासारखे आजार होत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पेटाने बियरचे फायदे सांगितले असले तरी बियर जास्त प्यायल्याने नुकसान पोहोचू शकते, असेही पेटाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ च्या एका रिपोर्टमध्ये पेटाने हा दावा केला आहे. या रिपोर्टमुळे शाकाहारी असण्याचे फायदे अधोरेखित केले जात आहे. पेटाच्या या दाव्यावर अनेक स्तरांतून टीका केली जात आहे. बियर हे एक अल्कोहोल पदार्थ आहे. बियर बनवण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो. त्यात पोषक तत्वे असून बियर बनवण्यासाठी ज्या गहू, मक्का, तांदळाचा वापर केला जातो ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच बियरमध्ये ९० टक्के पाण्यासह फायबर, कॅल्शियम, आयरनसह शरीराला फायदेशीर असलेले पोषक तत्व असतात. त्यामुळे बिअर प्यायल्याने मोठा फायदा होतो.

- Advertisement -

हेही वाचा – परिक्षेत पास होण्याची ऑफर देत केली शारीरिक सुखाची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -