घरट्रेंडिंगनागरिकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घटले

नागरिकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घटले

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली घसरण, देशातील सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरते आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे भाव सलग १२व्या दिवशी घटल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये सोमवारी (आज) पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी कमी झाला असून, पेट्रोल ८५.२४ रुपये प्रतिलीटर भावाने मिळत आहे. तर, डिझेलच्या दरात २१ पैशांनी घट झाली असून, मुंबईत आज डिझेल ७७.४० रुपये प्रतिलीटर भावाने मिळत आहे. तर राजधानी दिल्लीतही आज इंधनाच्या दरामध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोल ३० पैशांनी घटले असून, ते ७९.७५ रुपये प्रतिलीटर दराने उपलब्ध आहे. तर, डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले असून, डिझेलचा आजचा भाव ७३.८५ रुपये प्रतिलीटर इतका आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेली घट देशातील सर्वसामान्य लोकांसाठी दिलासादायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दर स्वस्त केले आहे. गेल्या १५ दिवसात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे इंधानाचे दर घसरल्यांचे सांगण्यात येत आहे. याचा लाभ तेल कंपन्या वाहनधारकांना करुन देत आहेत.


वाचा: रेल्वेत १२९ वर्षे जुने घड्याळ; आजही दर्शवते अचूक वेळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -