घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र चौथ्या दिवशी सुरुच

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र चौथ्या दिवशी सुरुच

Subscribe

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची होणारी दरवाढ कमी करण्याची घोषणा केली होती. दरवाढ कमी करुन देखील पुन्हा या दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे. चौथ्या दिवशी पुन्हा दरवाढ झाल्यामुळे जनता पुन्हा त्रस्त झाली आहे.

इंधनाचे दर कमी करुन सरकारने जनतेला काहिसा दिलासा दिला होता. मात्र पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. मंगळवारी चौथ्या दिवशी दरवाढ झाली आहे. त्यामुळे जनता पुन्हा त्रस्त झाली आहे. आधी दरवाढ कमी केल्याचे सरकारने जाहीर केले आणि आता पुन्हा दर वाढ सुरु झाल्यामुळे दरवाढ कमी करुन नेमका काय फायदा झाला असा सवाल जनता विचारत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात २३ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या दरामध्ये २९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.२६ रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ७४.११ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. दिल्लीसोबतच मुंबईमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये २३ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये ३१ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८७.७३ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे तर डिझेल ७७.६८ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेल दर केले होते कमी 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी इंधनाचे दर २.५० रुपयांनी कमी करण्याची घोषणा करत जनतेला दिलासा दिला होता. त्यानंतर अनेक राज्यामध्ये सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. देशभरामध्ये इंधनाचे दर २.५० रुपये ते ५ रुपयापर्यंत कमी करण्यात आले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता. या घोषणेनंतर शुक्रवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नाही. मात्र शनिवारपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरु झाले. दरवाढीचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -