घरदेश-विदेशपेट्रोल, डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ

Subscribe

कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. तसेच यानंतरही पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक काळात स्थिर राहिलेल्या पेट्रोलच्या दरांमध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज पेट्रोल ९ पैशांनी महाग झाले. तर डिझेलच्या किंमतीतसुद्धा वाढल्या आहेत. प्रतिलीटर डिझेल २६ पैशांनी महाग झाले आहे. दरम्यान सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. तसेच यानंतरही पेट्रोल, डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ५ दिवसांपूर्वीच पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर

नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ७५ रुपये तर डिझेल ६६.०४ रुपयांना मिळत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ८०.६५ रुपये आणि तर डिझेलची किंमत ६९.२७ रुपये एवढी झाली आहे. बेंगळुरुमध्ये ७७.५७ रुपयांना पेट्रोल तर ६८.२९ रुपयांना डिझेल मिळत आहे. तर हैदराबादमध्य पेट्रोलसाठी ७९.८१ रुपये तर डिझेलसाठी ७२.०७ रुपये माजावे लागत आहे. दरम्यान ५ दिवसांपूर्वीच देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरावले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. ४ डिसेंबर रोजी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८० रुपये ५९ पैसे या किंमतीला मिळत होते. तर डिझेलसाठी ग्राहकांना प्रति लिटर ६९ रुपये मोजावे लागत होते. दिल्लीतसुद्दा पेट्रोलचा दर ७४ रुपये ९१ पैसे होता तर डिझेल ६५ रुपये ७८ पैसे एवढ्या किंमतीत मिळत होते.

- Advertisement -

हेही वाचा – नागरिकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घटले

यंदाच्या वर्षात पेट्रोलने गाठला उच्चांक

आज दरवाढ होण्यापूर्वी काल पेट्रोलचा दर ८०.५१ रुपये होता. जानेवारी २०१९ मध्ये पेट्रोलचा दर ७३.९५ रुपये एवढा खाली गेला होता. तर याच वर्षी २ ऑक्टोबर रोजी पेट्रोलचा दर ८०.२१ रुपये एवढा दर झाला होता. यंदाच्या वर्षाच्या तुलनेत पेट्रोलच्या दरवाढीने आज उच्चांक गाठला आहे.

हेही वाचा – पेट्रोल-डिझेलचे दरवाढीचे सत्र सुरुच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -