घरताज्या घडामोडी२० व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं; मुंबईत सर्वात जास्त पेट्रोलची किंमत!

२० व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं; मुंबईत सर्वात जास्त पेट्रोलची किंमत!

Subscribe

सलग २० व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीशी वाढ झाल्याने देशातर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल २० व्या दिवशी महागलं आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलची किंमत ८० रुपयांच्या पुढे गेली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल-डिझेल इतकं महागलं आहे आणि प्रति लिटर किंमत ८०च्या पुढे गेल्या आहेत. दिल्लीत डिझेलच्या किंमतीत १७ पैशांची वाढ झाली असून नवीन किंमत प्रति लिटर ८०.१९ रुपये करण्यात आली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत २१ पैशांची वाढ झाली आहे. २० व्या दिवशी पेट्रोल ८.८७ आणि डिझेल १०.७९ रुपयांनी प्रति लिटर महागलं आहे. इतर शहरांपेक्षा मुंबईत पेट्रोलची किंमत सर्वात जास्त आहे.

- Advertisement -

शहर              पेट्रोल               डिझेल
दिल्ली            ८०.१३              ८०.१९
मुंबई               ८६.९१             ७८.५१
कोलकाता         ८१.८२           ७५.३४
चेन्नई               ८०.३७            ७७.४४
लखनऊ           ८०.७५            ७२.१८
बेंगळूरू            ८२.८४             ७६.२५
पटना             ८३.०८              ७७.१४

देशांच्या इतिहासात पहिल्यांदाचा डिझेच्या किंमतीने पेट्रोलच्या किंमतीला मागे टाकले आहे. सध्या ही परिस्थिती फक्त दिल्लीत आहे. उर्वरित देशातील भागात डिझेलच्या किंमती पेट्रोलपेक्षा कमी आहेत. दिल्लीत पेट्रोल-डिझेल महागल्याचं कारण व्हॅट आहे. जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालवधीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. लॉकडाऊनच्या काळात इंधनाचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मात्र सध्या अॅनलॉक असल्यामुळे अनेक जण कामासाठी बाहेर पडतं आहे. त्यामुळे या पेट्रोल-डिझेल किंमती होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे. यामुळे वाहतुकीचे दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जगात २४ तासांत १.७६ लाख नवे कोरोना रुग्ण, एकूण बाधितांचा आकडा ९७ लाख पार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -