घरदेश-विदेशसलग १६ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

सलग १६ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Subscribe

सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दरामध्ये घट होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना असताना कोणताही बदल होत नसल्यान नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रुड ऑईलचे बदलते दर यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये सातत्याने बदल होत असतो. मात्र मागील १६ दिवसांपासून पेट्राल व डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दरामध्ये घट होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना असताना कोणताही बदल होत नसल्यान नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या राजधानी नवी दिल्लीमध्ये एका लिटरमागे पेट्रोलचा दर ८१.०६ रुपये आहे. तर डिझेलचा दर ७०.४६ रुपये आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संकेतस्थळानुसार तेलाच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलच दर ८१.०६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ७०.४६ रुपए प्रति लिटर झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल ८७.७४ रुपए प्रति लिटर आणि डिझेल ७६.८६ रुपए प्रति लिटरला मिळत आहेत. त्याचबरोबर कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ८२.५९ रुपए आणि डिझेलसाठी ७३.९९ रुपए मोजावे लागत आहेत.चेन्नईमध्ये पेट्रोल ८४.१४ रुपए प्रति लिटर आणि डिझेल ७५.९५ रुपए प्रति लिटर आहे.

- Advertisement -

अमेरिकी एनर्जी इंर्फोमेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेडशनने (इआयए) दिलेल्या अहवालानुसार पुढील महिन्यात सात मोठ्या शेल फॉरमेशनच्या तेल उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. साधारणपणे १ लाख २१ हजार बॅरल कमी तेल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या दरामध्ये वाढ होऊन पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तरी देशांतर्गत बाजारामध्ये पेट्रो गुड्सवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.

सकाळी ६ वाजता ठरतो दर

पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये रोज सकाळी सहा वाजता बदल होतो. सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर लागू केले जातात. पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि अन्य बाबी जोडल्यानंतर त्याचा दर दुप्पट होतो. विदेशी मुद्रा दरांनुसार आंतरराष्ट्रीय बाजारामधील क्रूड ऑईलच्या किमतीनुसार रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -