Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोल नव्वदी पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोल नव्वदी पार, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील २५ महिन्यांतील उच्चांक गाठला

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या दरांच्या तुलनेत आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा ९० रुपयांच्या पार गेल्याने मुंबईकरांचं बजेट यामुळे कोलमडणार आहे. आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील २५ महिन्यांतील उच्चांक गाठला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. मात्र आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८४.४५ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत ९१.०७ रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ८५.९२ रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत ८७.१८ रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये २५ पैशांनी पेट्रोल महागले आहे. तर डिझेलची किंमत ८१.३४ रूपये प्रतिलिटर झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे डिझेलसह पेट्रोलच्या दरात २० पैशांहून अधिक वाढ झाली आहे.

पेट्रोलचे दर

- Advertisement -

दिल्ली – ८४.४५ रुपये प्रति लीटर
मुंबई – ९१.०७ रुपये प्रति लीटर
कोलकत्ता – ८५. ९२ रुपये प्रति लीटर
चेन्नई – ८७. १८ रुपये प्रति लीटर

डिझेलचे दर

दिल्ली – ७४.६३ रुपये प्रति लीटर
मुंबई – ८१.३४ रुपये प्रति लीटर
कोलकत्ता – ७८.२२ रुपये प्रति लीटर
चेन्नई – ७९. ९५ रुपये प्रति लीटर

असा पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

- Advertisement -

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

- Advertisement -