घरदेश-विदेशनिवडणुकीनंतर पेट्रोल दरात पुन्हा वाढ

निवडणुकीनंतर पेट्रोल दरात पुन्हा वाढ

Subscribe

निवडणुकीनंतर पुन्हा पेट्रोल दरात आज वाढ. पेट्रोल ११ पैशांनी वाढले आहे तर डिझेलचा दर जैसे थे आहे.

काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक गाठला होता. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात या दरांमध्ये हळूहळू घट होऊ लागली होती. गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलमध्ये दर वाढ किंवा कोणतीही घट होत नव्हती. मात्र नुकतीच पाच राज्यातील निवडणुकांची मतमोजणी पार पडली. या मतमोजणीनंतर तीन राज्यांत काँग्रेस तर एका ठिकाणी टीआरएस आणि एमएनएफचे सरकार सत्तेवर आले आहे. यामुळे भाजपचा सुफडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा दोन महिन्यांने पेट्रोलचे दर वाढले आहेत. मात्र डिझेल जैसे थे आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात ९ पैसे तर मुंबईत ११ पैशांची वाढ झाली आहे.

दिल्लीतील पेट्रोल – डिझेल दर

दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर ७०.२९ रुपये झाले आहे. तर डिझेल प्रतिलीटर ६७.६६ रुपये झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ७५.९१ पैसे प्रति लिटर झाले आहे. यापूर्वी अखेरची दरवाढ ही १६ ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यादिवशी पेट्रोलच्या दरात ११ पैशांची दर वाढ झाली होती आणि आज पुन्हा दोन महिन्याने ९ पैशांने दर वाढ झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत पेट्रोल – डिझेल दर

मुंबईत पेट्रोल ११ पैशांनी वाढले आहे. तर डिझेलचा दर वाढलेला नाही. मुंबईत डिझेलचा दर ६८.२६ पैसे प्रति लिटर इतके झाले आहे. दरम्यान कोलकातामध्ये पेट्रोल १ रुपयांनी वाढले होते तर डिझेलच्या दरात १ रुपयांनी घट झाली होती. तर नोएडामध्ये पेट्रोलचे दर २८ पैशांनी तर डिझेलमध्ये १९ पैशांनी वाढ झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे झाले आहेत.


वाचा – राज्यात ६,७६५ नवीन पेट्रोल पंप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -