घरCORONA UPDATEलॉकडाउन मोडलंत, तर शूट अॅट साईट; 'या' देशानं काढलं फर्मान

लॉकडाउन मोडलंत, तर शूट अॅट साईट; ‘या’ देशानं काढलं फर्मान

Subscribe

देशातील परिस्थिती चिघळत चालली आहे म्हणून मी पुन्हा एकदा या समस्येचं गांभीर्य सांगत आहे आणि आपण ते ऐकलंच पाहिजे," असे दुतेर्ते यांनी बुधवारी रात्री उशिरा सांगितलं.

फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी लॉकडाउनचं उल्लंघन करणार्‍यांना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यासह वैद्यकिय कर्मचाऱ्यांशी गैरव्यवहार केल्यास तो गुन्हा मानला जाईल. त्यामुळे जर कोणी लॉकडाउचं उल्लंघन करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील, असा धमकी वजा इशारा फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी दिला आहे. “सर्वांनी सहकार्य करणे आणि क्वारंटाईन राहणं आवश्यक आहे. कारण अधिकारी हा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. फिलिपिन्समध्ये कोरोना विषाणूने ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ३११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील परिस्थिती चिघळत चालली आहे म्हणून मी पुन्हा एकदा या समस्येचं गांभीर्य सांगत आहे आणि आपण ते ऐकलंच पाहिजे,” असे दुतेर्ते यांनी बुधवारी रात्री उशिरा सांगितलं.


हेही वाचा – अमेरिका रशियाकडून व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य खरेदी करणार; ट्रम्प-पुतीन यांची फोनवर चर्चा

- Advertisement -

“पोलिस आणि सैन्य दलाला माझे आदेश आहेत, जर काही समस्या उद्भवली आणि तुमच्यावर प्रतिहल्ला झाला तर त्यांना ठार मारा.” “समजलंय का? मृत्यू. त्रास होण्याऐवजी मी तुम्हाला दफन करेन.” रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील शारीरिक अत्याचार, गैरवर्तन थांबलं पाहिजे, असं दुतेर्ते म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी लॉकडाउन घोषित केलं. मात्र, काहीजण लॉकडाउनचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे दुतेर्ते यांनी धमकी वजा इशारा दिला. दरम्यान, भारतात देखील लॉकडाउनचे तीनतेरा वाजवले आहेत. लॉकडाउनचे नियम थाब्यावर बसवून लोक बिनधास्त बाहेर फिरत आहेत. त्यामुळे भारतावरही असा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -