Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश लाकूड भोसकून फोडले डोळे; १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामुहिक बलात्कार

लाकूड भोसकून फोडले डोळे; १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामुहिक बलात्कार

घडलेल्या घटनेनंतर मुलीची प्रकृती गंभीर

Related Story

- Advertisement -

बिहार राज्यात क्रूरपणाचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात चारा घेण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर काही लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. एवढंच नाही तर या घटनेनंतर मुलीची ओळख कोणालाही पटू नये, म्हणून लाकडाच्या तुकड्याने मुलीचे डोळे फोडण्यात आले आणि अशाच अवस्थेत तिला दूरवर फेकून नराधम फरार झाले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळतेय.

अशी घडली घटना

मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ही मुलगी मंगळवारी दुपारी ती शेळ्यांसाठी चारा आणि जळणासाठी लाकडं आणायला जवळच्या मनहरपूर गावाच्या नदीकिनारी गेली होती. दरम्यान यावेळी तिच्यावर काही क्रूर लोकांनी अतिप्रसंग केला. खूप वेळानंतर मुलगी घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी एका बागेत ती विवस्त्र बेशुद्ध अवस्थेत आढळली.

- Advertisement -

तिची प्रकृती नाजूक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला मधुबनी सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या एका डोळ्यात लाकूड भोसकून तिचा डोळा फोडण्यात आला. तर डोळ्यांवर झालेल्या जखमांमुळे तिच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या बलात्कारात सहभागी असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याचं नाव लक्ष्मी मुखिया असे आहे. असे सांगितले जात आहे की, मुलाच्या कुटुंबीयांनी या घटनेच्या वेळी नदीच्या दिशेने येताना त्याला पाहिले होते. तसेच, त्या व्यक्तीच्या कपड्यांवर, शरीरावर मातीसह गवत लागल्याचे देखील दिसत होते. या माहितीवरून त्या संशयिताचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -