घरदेश-विदेशVideo: इजिप्तच्या पिरॅमिडवर जाऊन केला 'प्रणय'

Video: इजिप्तच्या पिरॅमिडवर जाऊन केला ‘प्रणय’

Subscribe

डेन्मार्कमधील एका फोटोग्राफरने महिलेबरोबर पिरॅमिडवर जाऊन प्रणयक्रिडा केली आणि नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले.

इजिप्तमधील जगप्रसिद्ध गिझा येथील महाकाय पिरॅमिडवर जाऊन, एका जोडप्याने चक्क प्रणयक्रिडा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची आणि विकृत बाब म्हणजे त्या जोडप्याने स्वत:च प्रणय करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडिया आणि युट्यूबवर पोस्ट केला आहे. सोबतच त्यांनी काही फोटोही इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. शरीरसंबंध ही खरंतर अत्यंत खासगी बाब आहे मात्र, पर्यटकांनी अशाप्रकारे थेट पिरॅमिडवर जाऊन प्रणय करणं आणि ते व्हायरल करणं हे एकप्रकारे विकृत कृत्य असल्याची टीका, नेटिझन्सकडून होत आहेत. डेन्मार्कमधील फोटोग्राफर एंड्रियास एचवीड याने एका महिलेबरोबर पिरॅमिडवर जाऊन प्रणयक्रिडा केली आणि नंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. दरम्यान, इजिप्तमधील स्थानिक लोक तसेच सरकारने या फोटोंवर आक्षेप नोंदवला आहे.

दुसरीकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश इजिप्तचे इतिहास संशोधन मंत्रालयाचे मंत्री खलिद इल-अॅनी यांनी दिले आहेत. यासंबंधीचे वृत्त अऱ्हाम ऑनलाइन या इजिप्तमधील वेबसाईटने दिले आहे. या संदर्भात इजिप्तमधील एका माजी अधिकाऱ्याने हा व्हिडिओ आणि फोटो खोटे असल्याचा दावा केला होता. पिरॅमिडमध्ये रात्रीच्या वेळी प्रवेश करण्यास बंदी असूनही, पिरॅमिडवर चढून अशाप्रकारे कृत्य करणं सध्याची सुरक्षाव्यवस्था पाहता शक्य नसल्याचं मत, या अधिकाऱ्याने सीएनबीसी त्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून इच्छा होती…

दरम्यान, फोटोग्राफर एंड्रियासने डेन्मार्कमधील एक्स्ट्राब्लाडेड (Ekstrabladet) या वृत्तपत्राला मुलाखत देतेवेळी, घडल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. व्हायरल झालेले हे सर्व सर्व फोटो आणि व्हिडीओ खरे असून, मला याप्रकरणी अटक होऊ शकते म्हणून भविष्यात मी इजिप्तमध्ये जाणार नाही, असे एंड्रियासने या वृत्तपत्राला सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारचा व्हिडीओ आणि फोटो काढण्याची माझी इच्छा असल्यामुळे, मी हे कृत्य केल्याची कबुलीही त्याने दिली. आम्हाला हे करुन एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळाला. तेथून दिसणारे दृष्य खूपच अद्भूत होते, असंही तो म्हणाला.

प्रणय केला नाही…

एका भिंतीपलिकडे आम्ही लपलो होतो आणि रात्र झाल्यानंतर आम्ही पिरॅमिडवर चढल्याचं एंड्रियासने सांगितलं. दरम्यान, अशाप्रकारे पिरॅमीडवर जाऊन प्रणयक्रिडा करतानाची पोज आम्ही दिली पण प्रत्यक्षात शरिरसंबंध प्रस्थापित केले नाहीत, असा दावाही त्याने केला आहे. स्थानिक कायद्यानुसार इजिप्तमधील पिरामिडवर चढणे हा गुन्हा आहे. सध्या इजिप्तमधील यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत असून, लवकरच याचा अहवाल ते सादर केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -