घरदेश-विदेशतब्बल ११० कोटी वर्ष जुना 'गुलाबी' रंग!

तब्बल ११० कोटी वर्ष जुना ‘गुलाबी’ रंग!

Subscribe

गुलाबी रंगाच्या उत्पत्तीचा शोध ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी लावला आहे. गुलाबी हा जगातील सर्वात जुना रंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पाठोपाठ लाल हा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात जुना रंग आहे.

प्रेमाचा रंग गुलाबी, भारतातील गुलाबी शहर जयपूर, गुलाबी आँखे… हे गाणं, गुलाबी रंगाचं फुल…, आपल्या आयुष्यात हा गुलाबी रंग कोणकोणत्या निमित्ताने कधी तरी जोडला जातो. पण हा गुलाबी रंग आला कुठून, त्याची निर्मिती कधी झाली, याचा विचार आपण कधी केलाय का, नाही ना. मात्र ऑस्ट्रेलियातील एका युनिव्हर्सिटीने संशोधनातून गुलाबी रंगांचा इतिहास शोधून काढला आहे. बहुतांश लोकांचा हा आवडता गुलाबी रंग तब्बल ११० कोटी वर्ष जुना आहे. तसेच हा जगातील सर्वात जुना रंग असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी (एएनयू) मधील शास्त्रज्ञांनी गुलाबी हा जगातील सर्वाधिक जुन्या रंग असल्याचा शोध लावला आहे. यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ ते संशोधन करत होते.

लाल हा दुसरा सर्वात जुना रंग

तेथील शास्त्रज्ञांना सहारा मरुस्थळ येथील गुहेमधून आणलेल्या खडकांमध्ये या गुलाबी रंगाचे पुरावे सापडले आहेत. संशोधकांना अभ्यासानंतर लक्षात आले की हे पुरावे साधारण ११० कोटी वर्ष जुने आहेत. हे पुरावे गुलाबी रंगांच्या तंतूमधून शोधण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनी या रंगांला गडद गुलाबी म्हटलं आहे. या रंगाला उष्णता दिल्यास ते रक्ताच्या लाल रंगासारखे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाल हा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात जुना रंग असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सहारा मरुस्थळच्या नजीक एक गुहा आहे. येथे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी तेथील खडकाला ठेचून त्याची पावडर बनवली. त्यांनतर त्यातून काही रंगांचे तंतू मिळाले. हे संशोधन डायनासोरचे अवशेष शोधण्याइतकेच दुर्मिळ आहे. सुरूवातीला आम्हाला गुहेतून काही परमाणू सापडले. ज्यावेळी त्याला सुर्याच्या उजेडात ठेवण्यात आले, तेव्हा त्याचा रंग गुलाबी असल्याचे स्पष्ट झाले.
– प्रो. जोशेन ब्रोक्स, शास्त्रज्ञ, एएनयू

- Advertisement -

पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी केली लॅब टेस्ट

गुहेतून मिळालेल्या खडकापासून पावडर बनवून गुलाबी रंग शोधण्याचे काम युनिव्हर्सिटीच्या पीएचडीचे विद्यार्थी नूर गुनेली यांच्या नेतृत्वाखालील टीमने केले. यासंबंधी गुनेला यांनी म्हटले की, आम्ही गुहेतील काही खडकांची बारीक ठेसून पावडर बनवली. आमच्यासाठी ही एक आश्चर्यकारक गोष्ट होती, की एखादा करोडो वर्ष जुना असलेला रंग आजही अस्तित्वात आहे. अभ्यासासाठी या खडकांना १० वर्षांपूर्वी लॅबमध्ये आणण्यात आले होते. तेव्हापासून याच्यावर संशोधन सुरू होते.

मानव जातीचा पहिला पुरावा ६० कोटी वर्ष जुना

प्रो. ब्रोक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पृथ्वीतलावर मानव जातीच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा ६० कोटी वर्षांपूर्वीचा आहे. असे असल्यास गुहा ही पृथ्वीवर मानवापेक्षाही आधीपासून अस्तित्वात असल्याचे समजते. या संशोधकांच्या टीममध्ये ऑस्ट्रेलियासोबतच अमेरिका आणि जपान येथील शास्त्रज्ञांचाही समावेश होता. यांचे हे संशोधन नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स येथे सामिल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -