घरट्रेंडिंगतो डिलिव्हरी बॉय पिझ्झा देण्याआधी त्यावर थुंकायचा आणि ते शूट करायचा!

तो डिलिव्हरी बॉय पिझ्झा देण्याआधी त्यावर थुंकायचा आणि ते शूट करायचा!

Subscribe

तुम्ही जर फास्ट फूडी आणि त्यातही पिझ्झा लव्हर असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्याकडे पिझ्झाचे चाहते खूप आहेत. त्यातही घरी पिझ्झा मागवणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. हे पिझ्झा सामान्यपणे डिलिव्हरी बॉय घेऊन येतात. पण आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय ऑर्डरचा पिझ्झा पोहोचवण्यापूर्वी त्याच्यावर थुंकायचा. आपल्या या कृतीचं स्वत:च्याच फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा आणि नंतर तो थुंकलेला पिझ्झा ग्राहकाला द्यायचा. एका ग्राहकाने हा सारा प्रकार उघड केला आहे.

आधी थुंकला, मग बॉक्स बंद केला आणि ग्राहकाला दिला!

ऑर्डर केलेला पिझ्जा हा डिलिव्हरी बॉय घेऊन आला असताना एका ग्राहकाला त्याचा संशय आला. त्याने सोसायटीचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं असताना समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. हा डिलिव्हरी बॉय पिझ्झामध्ये थुंकताना त्याला दिसला. विशेष म्हणजे तो हे सगळं आपल्या मोबईलमध्ये शूट करत होता. हे सगळं झाल्यानंतर त्याने सराईतपणे पिझ्झा पुन्हा बंद केला आणि तो डिलिव्हरी देण्यासाठी घेऊन गेला.

- Advertisement -

१८ वर्षांच्या शिक्षेची मागणी

या सगळ्या प्रकारानंतर ग्राहकाने सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर तक्रार दाखल केली आणि या पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या विरोधात कोर्टात केस देखील देली. दरम्यान, याच डिलिव्हरी बॉयवर याआधी देखील अशाच प्रकारच्या एका प्रकरणामध्ये मोठा आर्थिक दंड ठोठावला होता. मात्र, त्याने पुन्हा एकदा तशाच प्रकारचा गुन्हा केल्यामुळे आता त्याला किमान १८ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी फिर्यादी ग्राहकाच्या वकिलाकडून करण्यात येत आहे.

एका स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भातला व्हिडिओ आणि वृत्त प्रसारित केलं आहे. या वृत्तानुसार ही घटना २०१७मधील आहे. तुर्कस्थानच्या एस्किशर शहरात हा प्रकार घडला आहे. एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणी बुरक एस. नावाच्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयविरोधात सध्या तिथल्या स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरू असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -