घरताज्या घडामोडीकेरळ विमान अपघात: दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू!

केरळ विमान अपघात: दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू!

Subscribe

केरळच्या कोझिकोडमध्ये शुक्रवारी रात्री विमानाचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. दुबईहून एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान लँडिंग करताना घसरले आणि ३५ फूट खोल दरीत कोसळले. या अपघतात विमानाचे दोन तुकडे झाले. तसेच यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. सध्या बचाव कार्य सुरू आहे. अपघाती विमानाला घटनास्थळावरून काढले जात आहे. परराष्ट्र राज्यमंत्री परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोझिकोड येथे पोहोचले आहेत.

- Advertisement -

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेतेला सांगितले की, ‘या अपघतात दोन वैममानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. हे दुर्दैवी आहे. १२७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी हे विमान कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. जर विमानाला आग लागली असती तर आमचे काम आणखी कठीण झाले आहे. पण सुदैवाने विमानाला आग लागली नाही. मी विमानतळावर (करिपूरमधील कोझिकोड आंततराष्ट्रीय विमानतळ) जात आहे.’

- Advertisement -

वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचे AXB1344, बोईंग ७३७ दुबईहून कोझिकोडकडे येत होते. या विमानात १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते. हे विमान कोझिकोड येथे पोहोचले आणि धावपट्टी पार करून भिंतीवर धडकले असून त्यामध्ये विमानाचे दोन भाग झाले. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले.


हेही वाचा – Kerala Air India Crash महाराष्ट्राचे लढाऊ वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -