Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश श्रीनगर एयरपोर्टवर गोठलेल्या बर्फाला विमानाची धडक

श्रीनगर एयरपोर्टवर गोठलेल्या बर्फाला विमानाची धडक

बर्फाच्या ढीगाऱ्यात अडकले विमान

Related Story

- Advertisement -

श्रीनगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी प्रवाशी विमान गोठलेल्या बर्फाला धडकले आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली आहे. श्रीनगर विमानतळावर बुधवारी दुपारी १२.३० वाजता श्रीनगरहून दिल्लीकडे जाणारे इंडिगो विमान उड्डाण क्रमांक ६ ई-२५५९ रणवेवर उड्डाण करण्यासाठी सज्ज होते. या विमानात २३३ प्रवाशी प्रवास करत होते. विमान धावपट्टीच्या दिशेने उड्डाणाच्या मार्गावर धावत होते. अचानक इंडिगो विमानाच्य्या एका बाजूचे इंजिन गोठलेल्या बर्फावर धडकले.

धावपट्टीवर गोठलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकल्यावर विमानाचे इंजिन बर्फात अडकले. ही घटना घडल्यावर लगेचच विमानतळावरील अग्निशमन व आपत्कालीन सेवेतील कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले. तसेच विमानतळावर तैनात सुरक्षा यंत्रणा आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेचा अधित तपास सुरु आहे.

- Advertisement -