घरदेश-विदेशआता कोरोनाची भिती नष्ट; ३० सेकंदात CoronaVirus होणार नाहीसा, संशोधकांचा नवा शोध

आता कोरोनाची भिती नष्ट; ३० सेकंदात CoronaVirus होणार नाहीसा, संशोधकांचा नवा शोध

Subscribe

प्लाझ्मा जेटच्या मदतीने वस्तूंच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल, असा विश्वात प्लाझ्मा जेटच्या संशोधकांना आहे.

देशभरासह जगात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. तर जगभरामध्ये भिती असणाऱ्या कोरोनाची लस शोधण्यासाठी वेगवगेळ्या देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. कोरोनावरील लस तसेच औषधं शोधण्यासाठी अजूनही कित्येक चाचण्या सुरू आहे. एकीकडे हे संशोधन सुरु असतानाच दुसरीकडे पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना दिलासादायक बातमी समोर येत आहे. वैज्ञानिकांनी कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याची क्षमता प्लाझ्मा जेटमध्ये असल्याचा दावा केला आहे. प्लाझ्मा जेटच्या मदतीने अवघ्या ३० सेकंदांमध्ये कोरोनाचा विषाणूचा खात्मा करता येतो असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

प्लाझ्मा जेट बद्दल…

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील लॉस एन्जलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने धातू, चामडे आणि प्लास्टिकवर असणारा कोरोना विषाणू अवघ्या ३० सेकंदांमध्ये नष्ट करता येतो. संशोधकांनी थ्री-डी प्रिंटरच्या मदतीने हा प्लाझ्मा जेट तयार केला आहे. या प्लाझ्मा जेटची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.

- Advertisement -

संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटचा स्प्रे प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि चामड्यावर मारण्यात आला. यामध्ये कोरोनाचा विषाणू हा तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये नष्ट करण्यात यश आल्याचे दिसून आलं. बहुतांश विषाणू हे ३० सेकंदांमध्ये नष्ट झाले. यासंदर्भात संशोधनाचा अहवाल फिजिक्स ऑफ फ्लुएड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, प्लाझ्मा जेट हा पदार्थांच्या चार मूळ अवस्थांपैकी एक आहे. तर स्थिर गॅसला गरम करुन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आणून प्लाझ्मा जेट तयार करता येतो. प्लाझ्मा जेट स्प्रे हा फेस मास्कवरही वापरता येईल. इतर गोष्टींप्रमाणे हे मास्कवरही परिणामकारक ठरेल.

कोरोना विषाणू हा अनेक पृष्ठभागावर कित्येक तास राहतो, असे यापूर्वी झालेल्या अनेक संशोधनातून समोर आले आहे. मात्र प्लाझ्मा जेटच्या मदतीने वस्तूंच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल, असा विश्वात प्लाझ्मा जेटच्या संशोधकांना आहे.


अशी दिवाळी ४९९ वर्षांनीच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -