घरदेश-विदेशमन की बात : पंतप्रधानांनी शेअर केला धुळ्यातल्या शेतकऱ्याची चिकाटीचा अनुभव

मन की बात : पंतप्रधानांनी शेअर केला धुळ्यातल्या शेतकऱ्याची चिकाटीचा अनुभव

Subscribe

शेतमालाचे पैसे वसुलीसाठी वापरलं नव्या कृषी कायद्याच अस्त्र

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याने शेतमालाचे पैसे मिळवण्यासाठी कृषी कायद्याचा प्रभावी वापर केल्याची बातमी आजच्या मनकी बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहे. आपल्या शेतात लावलेल्या मक्याच्या पिकासाठी ठरलेल्या किमती इतके पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळेच त्यांनी नव्या कृषी कायद्याचा वापर केला याची माहिती पंतप्रधानांनी शेअर केली आहे.

- Advertisement -

 

धुळे जिल्ह्यातील शेतकरी असलेल्या जितेंद्र भोई या शेतकऱ्याने आपल्या शेतात मका लावला. उत्तम किंमत मिळावी म्हणून तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचे निश्चित केले. पिकाची किंमत ही ३ लाख ३२ हजार इतकी निश्चित झाली. जितेंद्र भोई यांना २५ हजार रूपये आगाऊ रक्कम म्हणून मिळाली खरी, पण उरलेले पैसे १५ दिवसांत दिले जातील असे सांगितले गेले. पण अशी काही परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे त्यांना उरलेले पैसे मिळाले नाहीत. इतर शेतकऱ्यांना शेतमालाच्या पैशांबाबत येणारा अनुभव त्यांनाही आला होता. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा, मात्र त्या मोबदल्यात महिनोमहिने पैसे द्यायचे नाहीत असा अनुभव त्यांनाही आला. चार महिने त्यांनी आपल्या शेतमालाच्या पैशांची वाट पाहिली. पण हाती काहीच लागल नाही.

- Advertisement -

शेवटी त्यांनी केंद्र सरकारकडून सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या नव्या कृषी कायद्याचा वापर केला. हाच नवा कायदा त्यांच्या कामी आला. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर तीन दिवसांतच शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील अशी अट आहे. जर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर शेतकरी त्याविरोधात तक्रार करू शकतो, याच कायद्यातील तरतुदीचा वापर जितेंद्र भोई यांनी केला. या शेतकऱ्याने तक्रार केली आणि काही दिवसातच त्यांना हक्काचे पैसे मिळाले. कायद्याची योग्य आणि पुर्ण माहिती ही जितेंद्र भोई या शेतकऱ्याची ताकद झाली. भ्रम आणि अफवांपासून दूर राहत आणि खरी माहिती ही खूप मोठी शक्ती असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये म्हटले आहे.

गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या आज पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -