घरअर्थजगतPM Kisan: असं दुरुस्त करा नाव, हप्ता मिळण्यास अडचण येणार नाही

PM Kisan: असं दुरुस्त करा नाव, हप्ता मिळण्यास अडचण येणार नाही

Subscribe

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यी या टप्प्यांचा वापर करून आपल्या नावांमध्ये सुधारना करुन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. तथापि, ही योजना लॉकडाऊनच्या वेळी देशातील वंचित, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकर्‍यांना संजीवनी पेक्षा कमी नाही. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. सरकार ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवते. आर्थिक वर्ष २०२०-२१ चा पहिला हप्ता सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला आहे. तथापि, जर आपण पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असाल आणि ती रक्कम अद्याप आपल्या खात्यात मिळाली नाही, तर त्यामागील एक कारण म्हणजे पीएम किसान रजिस्टरमध्ये नोंदणीकृत आपलं नाव आणि आधार कार्डमध्ये नोंदवलेलं नाव यात फरक असू शकतो.

असं करा नाव दुरुस्त

१. प्रथम आपल्याला पंतप्रधान किसन योजनेच्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.

- Advertisement -

२. आता फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) टॅबवर जा.

३. तिथल्या ड्रॉप डाऊन यादीमधून तुम्हाला ‘आधार फेल्युअर रेकॉर्ड’ (Aadhaar Failure Record) वर क्लिक करा.

- Advertisement -

हेही वाचा – PM Kisan: असं जाणून घ्या सरकारने आपल्या खात्यावर २ हजार रुपये पाठवले की नाही


४. नवीन पानावर तुम्हाला आधार क्रमांकासह कॅप्चा कोड अॅड करुन पुढे जावं लागेल.

५. आता तुम्हाला एडिटचा पर्याय मिळेल.

६. आता तुम्ही आधार कार्डमध्ये दिलेल्या नावानुसार पीएम किसान रेकॉर्डमध्ये आपलं नाव दुरुस्त करू शकता.


हेही वाचा – आतापर्यंत ४५ लाख श्रमिकांना गावी सोडलं, ८० टक्के प्रवासी यूपी-बिहारचे – रेल्वे मंत्रालय


तथापि, आपण पीएम किसान सन्मान निधी अ‍ॅपद्वारे पीएम किसान रेकॉर्ड सुधारू शकता. आपण Google Play Store वरून हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. हे अ‍ॅप एनआयसीने विकसित केलं आहे. या अ‍ॅपद्वारे आपण पीएम किसान संबंधित जवळपास सर्व सेवा मिळवू शकता. या अ‍ॅपद्वारे आपण पंतप्रधान किसान योजनेसाठी नोंदणी करू शकता. याशिवाय सरकारने आपल्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता पाठवला आहे की नाही हेदेखील तुम्ही पाहू शकता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -