घरताज्या घडामोडीसंविधान दिन निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

संविधान दिन निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

Subscribe

संविधान दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. आज या कार्याक्रमाला दुपारी १२.३० वाजता सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सर्व विधानसभेच्या सभापती आणि पीठासीन आधिकाऱ्यांना संबोधित करतील. तसेच पक्षाचे कार्यकर्ते देशातील जिल्हा आणि बूथ सेंटरमधील पक्ष कार्यालयांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व विधानसभेच्या सभापतींना मोदी संबोधित करतील.

देशभरात आज सर्वत्र संविधान दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी आज गुजरातच्या केवडियामध्ये सकाळी ११ वाजता संविधान प्रस्ताविकेचे वाचन करतील. या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यालयासह शिक्षण संस्थांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होतील.

- Advertisement -

२६ नोव्हेंबर १९४९ साली भारती संविधान सभेसमोर मांडले आणि त्याच दिवशी औपचारिकरित्या भारतीय राज्यघटना स्वीकारली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मुल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी संविधान दिवस २६ नोव्हेंबरला साजरा केला जातो. हा दिवस देशाचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्याचंही प्रतिक आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. संविधान निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान संविधान संपूर्ण रुपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.


हेही वाचा –  नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक; आंदोलक दिल्लीच्या सीमेवर दाखल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -