घरCORONA UPDATEपीएम केअर्स निधीला सढळ हाताने देणगी द्या- पंतप्रधानांचे आवाहन

पीएम केअर्स निधीला सढळ हाताने देणगी द्या- पंतप्रधानांचे आवाहन

Subscribe

कोविड-19 महामारीने संपूर्ण जग व्यापून टाकले असून जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. भारतातही कोरोना विषाणूचा प्रसार चिंताजनक असून आपल्या देशासमोर आरोग्य आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे सरकारच्या मदतीसाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असंख्य लोकांकडून विनंती केली जात आहे.

दरम्यान बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यानेही कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. तसेच भाजपचे नगरसेवक, आमदार व खासदारही कोरोनाच्या संकटात गरजूंच्या मदतीसाठी धावून आले असून अनेकजण सढळ हाताने मदत करत आहेत.

- Advertisement -

संकटाच्या परिस्थितीत, मग ते नैसर्गिक असो वा अन्य दुसरे , पायाभूत सुविधा आणि क्षमताना होणारे नुकसान कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित आणि सामूहिक कारवाईची गरज असते. म्हणूनच, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक क्षमता पुनर्रचना/ संवर्धनासह आपत्कालीन स्थितीत जलद प्रतिसाद देणारी क्षमता निर्माण करणे आणि समाजाला त्वरित सावरण्याची तयारी ताबडतोब करावी लागते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रगत संशोधनाचे निष्कर्ष देखील अशा एकत्रित कृतीचा अविभाज्य घटक बनतात.

कोविड-19 महामारी सारख्या कसोटीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याच्या प्रमुख उद्दिष्टासह समर्पित राष्ट्रीय निधी असावा. ही गरज लक्षात घेऊन तसेच पीडितांना मदत पुरवण्यासाठी ‘आपत्कालीन परिस्थिती निधीसाठी पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत’ (पीएम केअर्स फंड) या शीर्षकाअंतर्गत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत.

- Advertisement -

लोकसहभाग हा कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच विश्वास दाखवला असून हे त्याचेच आणखी एक उदाहरण आहे. या निधीमध्ये अगदी छोट्या रकमेची देणगी देखील देता येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक अगदी छोट्या प्रमाणात का होईना आपले योगदान देऊ शकतील.

नागरिक आणि संघटना pmindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पंतप्रधान केअर्स निधीमध्ये पुढील माहिती भरून देणगी देऊ शकतात.

Account Number : 2121PM20202

IFSC Code : SBIN0000691

SWIFT Code : SBININBB104

Name of Bank & Branch : State Bank of India, New Delhi Main Branch

UPI ID : pmcares@sbi

pmindia.gov.in संकेतस्थळावर देणगी भरण्याचे पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड

इंटरनेट बँकिंग

यूपीआय (भीम , फोनपे , अमेझॉन पे , गूगल पे, पेटीएम, मोबिक्विक इ.)

आरटीजीएस / एनईएफटी

कलम 80 (जी) अंतर्गत निधीमध्ये दिलेल्या देणग्यांना प्राप्तिकरातून सूट देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -