घरताज्या घडामोडीमोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ नाही तर 'बेरोजगार दिवस' ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड!

मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ नाही तर ‘बेरोजगार दिवस’ ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड!

Subscribe

१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली. यावर्षी मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबर मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दुसरीकडे मात्र  भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर भाजपाच्या ‘सेवा सप्ताह’ला आवाहन म्हणून हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचंही आवाहन विरोधकांनी केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील #NoMoreBJP हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

- Advertisement -

बिहारमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तरेततील राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्यावर्षी पंतप्रधानांचा वाढदिवस एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाने निर्णय घेतला आहे. बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरून हा आठवडा बेरोजगारी सप्ताह म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं आहे.

#NoMoreBJP आणि #बेरोजगार_सप्ताह हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलं. त्यामुळेच #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी रात्री भारतामधील टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगच्या यादीत पाचव्या स्थानी आला होता.


हे ही वाचा – पृथ्वीबरोबर आणखी एका ग्रहावर आहे जीवसृष्टी, शास्त्रज्ञांच्या अभ्यासात आलं समोर!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -