घरदेश-विदेशकर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क; मोदींना म्हणाले इस्रोसाठी अशुभ

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क; मोदींना म्हणाले इस्रोसाठी अशुभ

Subscribe

इस्रोच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीवर कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची टीका

गेल्या आठवड्यात विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. या प्रसंगाच्यावेळी पंतप्रधान मोदी बंगळुरू येथील इस्रोच्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या कार्यालयाला भेट दिली. ही भेट अपशकुन ठरल्याचा अजब तर्क कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी म्हटले आहे. मोदी अशाप्रकारे बंगळुरात आले होते जसे काय तेच चांद्रयानचं लँडींग करून तेच संदेश पाठवणार होते, असे वक्तव्य करत कुमारस्वामींनी मोदींवर टीका केली.

- Advertisement -

मोदी बंगळुरूत असा आवेशात आले होते, जणू तेच चांद्रय़ान-२ उडवत आहेत. मात्र मोदींनी दिलेली ही भेट कदाचित तिथे असणाऱ्या शास्त्रज्ञांकरिता अशुभ ठरली, असे कुमारस्वामींनी म्हटले. यासोबत चांद्रयान -२ मोहिमेसाठी इस्रोने १० ते १२ वर्ष मेहनत घेतली. मात्र, २००८ साली या मोहिमेला मंजुरी मिळाली, असे देखील त्यांनी सांगितले.

अद्याप विक्रम लँडरशी संपर्क नाही

गेल्या आठवड्यात विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला तेव्हा विक्रम फक्त चंद्रापासून २.१ किमीवर होतं. यानंतर इस्त्रोच्या ऑर्बिटरने विक्रमचा फोटो काढला. मात्र विक्रम लँडरशी संपर्क झालेला नाही. त्याठीचे प्रयत्न सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -