घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी केदारनाथमध्ये साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान मोदी केदारनाथमध्ये साजरी करणार दिवाळी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथमध्ये साजरी करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुफेचं लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीची दिवाळी कुठे साजरी करणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथमध्ये साजरी करणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस अगोदर अर्थात ६ नोव्हेंबरला केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सध्या जोरात तयारी सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्यान गुफेचं लोकार्पण करण्यात येणार आहे. केदारनाथपासून ४०० मीटर उंचावर ध्यान गुफा आहे. या गुफेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दौऱ्यावेळी लोकार्पण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ही ध्यान गुफा ५ मीटर लांब आणि ३ मीटर रूंद आहे. या गुफेमध्ये एकावेळी एका व्यक्तीला योग आणि ध्यान – धारणा करता येणार आहे. या गुफेमध्ये टेलिफोन, वीज, पाणी आणि स्वच्छतागृहाची देखील सोय असणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -