इन्स्टाग्रामवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणारा नेता

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते ठरले आहेत.

Mumbai

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. व्हॉटसअॅप, फेसबुक, टिकटॉक आणि हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे इन्स्टाग्राम. इन्स्टाग्राम या लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅपवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात जास्त फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आले आहे.

मोदींचे १५.५ दशलक्ष फॉलोअर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर मोदींचे एकूण १५.५ दशलक्ष फॉलोअर्स आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचा नंबर लागतो. जोको विडोडो यांचे १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे १०.९ दशलक्ष इतके फॉलोअर्स आहेत. तर चौथ्या क्रमांकावर पोप फ्रांसिस असून पाचव्या क्रमांकावर जॉर्डनची महाराणी क्वीन रनिया ही सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.


वाचा – इन्स्टाग्राम खुलवणार तुमची प्रोफाईल, केला ‘हा’ बदल


ही आहे जॉर्डनची महाराणी क्वीन

रनिया ही कुवैतमध्ये जन्मलेली एक साधारण मुलगी होती. सध्या तिचे वय ४८ असले तरी देखील ती एखाद्या तरुणीप्रमाणेच दिसत आहे. त्यानंतर ती आता महाराणी बनली आहे.


वाचा – मॉडेलचे इन्स्टाग्राम हॅक; १ लाखाच्या खंडणीची मागणी


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here