Wednesday, January 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश खूप दिवसानंतर एकांत मिळाला,ध्यानधारणेनंतर मोदींची प्रतिक्रिया

खूप दिवसानंतर एकांत मिळाला,ध्यानधारणेनंतर मोदींची प्रतिक्रिया

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्‍यांनी केदारनाथाची मनोभावे पूजा केली. यानंतर ते दुपारी केदारनाथमध्येच एका गुहेत ध्यानधारणेसाठी बसले होते.

Related Story

- Advertisement -

अनेक वर्षांपासून मला या अध्यात्‍मिक भूमिवर येण्याचे भाग्‍य मिळत आहे. अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणेनंतर गपहेतून बाहेर आल्यानंतर व्यक्त केली. शनिवारी (ता. १८) केदारनाथाचे दर्शन घेतल्‍यानंतर पंतप्रधान मोदी हे येथील एका गुहेत ध्यानधारणेसाठी बसले होते.ही ध्यानधारणा समाप्त करून येथून आज (ता.१९) सकाळी ते बाहेर आले. बर्‍याच वर्षानंतर या गुहेत आपल्‍याला एकांतवासाची अनुभूती मिळाली. असं मोदी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

- Advertisement -

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. यावेळी त्‍यांनी केदारनाथाची मनोभावे पूजा केली. यानंतर ते दुपारी केदारनाथमध्येच एका गुहेत ध्यानधारणेसाठी बसले होते. काल शनिवारचा पूर्ण दिवस त्‍यांनी गुहेतच ध्यानधारणेत घालवला होता. यानंतर आज सकाळी ते या गुहेतून बाहेर आले. यावेळी त्‍यांनी केदारनाथ मंदिरात जाउन केदारनाथाचे दर्शन घेतले.

- Advertisement -

आज सातव्या अंतीम टप्प्यातील मतदान सुरू आहे. गुरूवारी रात्री प्रचारसंपला. यानंतर शनिवारी नरेंद्र मोदी केदारनाथला आले. आज सकाळी गुहेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांसी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍याला या केदारनाथाच्या पवित्र भूमिवर गेल्‍या अनेक वर्षांपासून येण्याचे भाग्‍य मिळत आहे. इथल्‍या गुहेत मला बर्‍याच वर्षांनंतर एकांतवासाची अनुभूती मिळाल्‍याचे सांगितले. तसेच आपण या भूमिच्या विकासासाठी प्रयत्‍नशिल आहोत असे सांगत, त्‍यांनी पर्यावरण आणि पर्यटनाच्या माध्यमातून विकासाचा आपला प्रयत्‍न राहणार आहे असे सांगितले.

केदारनाथशी माझं वेगळं नाते आहे. इथल्‍या २०१३ मधील नैसर्गिक आपत्‍तीनंर मी इथल्‍या मंदिर आणि परिसराच्या विकासाच्या दृष्‍टीने एक मास्‍टर प्लान बनवला आहे. त्‍यादृष्‍टीने विकासाचे काम सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मी इथल्‍या विकासकामांचा आढावा घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याचबरोबर त्‍यांनी यावेळी निवडणूक आयोग आणि प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्‍यांनी आपण केदारनाथाकडे काहीही मागितले नसल्‍याचे सांगितले.


लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे.

- Advertisement -