घरताज्या घडामोडीभारत-चीन सीमा वादामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प

भारत-चीन सीमा वादामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

Subscribe

भारत आणि चीन सीमावादाच्या प्रकारामुळे भारत नाखूश असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.

देश एकीकडे कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत आहे. तर दुसरीकडे भारत आणि चीनमधील सीमावाद तणाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे की, ‘यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. पण चीनशी झालेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाही आहेत.’ यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी करण्याचा पुनर्रुच्चार केला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. १.४ बिलियन लोकसंख्या असलेल्या या दोन देशांमधील सैन्यांची ताकद मजबूत आहे. या संपूर्ण प्रकारावरून भारत नाखूश आहे, तसेच चीनदेखील आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी मी बोललो आहे. पण सध्या चीनशी असलेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाही आहेत.’

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘भारत आणि चीनमधील हा एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत.’

- Advertisement -

भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याच्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, ‘जर माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मदत करेन.’ यापूर्वी ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण भारताकडून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.


हेही वाचा – ‘कोरोना’ ही संपूर्ण जगासाठी चीनतर्फे मिळालेली सर्वात वाईट भेट – डोनाल्ड ट्रम्प


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -