‘एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिर्ला ओम…’

खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या वेगळ्या आणि खास शैलीत त्यांचे अभिनंदन केले.

Delhi
Ramdas Athawale

खासदार ओम बिर्ला यांची आज, बुधवारी लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. मात्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या वेगळ्या आणि खास शैलीत त्यांचे अभिनंदन केले. आठवले यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या भाषणात कवितेतून त्यांनी भावना मांडल्या. यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.

आठवलेंची ओम बिर्ला यांच्यासाठी प्रतिक्रिया 

तुम्ही हसत नाही. मात्र मी मात्र तुम्हाला हसवत राहणार. त्यांच्या या खास शैलीतील भाषणाने पंतप्रधान मोदींसह युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हसू आवरता आले नाही. सभागृहातही हास्यकल्लोळ पहायला मिळाला.

आठवले यांच्या कवितेच्या ओळी – 

‘एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए बिर्ला ओम
लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम
नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप रहो खुशहाल
हम सब मिलकर एकता की मशाल, भारत को बनाते हैं और भी विशाल
आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए शान
भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं परफेक्ट हैं मॅन’

राहुल गांधींनाही दिल्या शुभेच्छा 

आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी खुप प्रयत्न केले. मात्र, लोकशाहीत लोकांना जे हवे त्यांचेच सरकार बनते. जेव्ही तुमची सत्ता होती त्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता तुमची सत्ता नाही. निवडणुकीआधी काँग्रेसवाले सांगत होते की आमच्याकडे या, मात्र मी हवेचा रोख मोदींकडे असल्याचे पाहिले.