आता मोदींना चित्रपट बघायला वेळ नाही, तर गुणगुणतात ‘ही’ दोन गाणी

अक्षयने मोदींना विचारले की, तुम्हाला हिंदी संगीत आवडते का? त्यावेळी मोदींनी त्यांना या आवडणाऱ्या दोन गाण्यांचा  आवर्जून उल्लेख केला

Mumbai

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या मुलाखतीत राजकीय गोष्टी वगळून मोदींच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल यावेळी मोदींना बोलते करण्याचा प्रयत्न अक्षयने केला. यावेळी अक्षयने तुम्ही चित्रपट बघता का?, तुम्ही शेवटचा कोणता चित्रपट पाहिल्याचे आठवते का? असा प्रश्न मोदींना विचारला असता मोदींनी सांगितले, चित्रपट बघायला जास्त वेळ मिळत नाही.

यासोबतच मोदींनी सांगितले की, ‘मी ज्यावेळी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अमिताभ बच्चन आले होतो. त्यांनी मला त्यांचा ‘पा’ हा चित्रपट बघण्याची विनंती केली होती. तेव्हा मी त्यांच्या सह चित्रपट बघायला गेलो होतो, परंतु आता मोकळा वेळ मिळत नाही.’

हे गाणे गुणगुणतात मोदी

अक्षयने मोदींना विचारले की, तुम्हाला हिंदी संगीत आवडते का? त्यावेळी मोदींनी त्यांना आवडणाऱ्या दोन गाण्यांचा  आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, मी जास्त गाणे गात नाही, परंतु मला ‘ज्योती कलश छलके’ आणि ‘पवन वेग से उड़ने वाले’ हे दोन गाणे अधिक आवडतात. हे दोन्ही गाणे गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजात गायले होते.